‘मीठे में क्या है’ प्रदर्शित
ओटीटीवर ऋत्विक भौमिकचा चित्रपट
बंदिश बँडिट्स फेम ऋत्विक भौमिकचा नवा चित्रपट ‘मीठे में क्या है’चा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला. हा एक नेटफ्लिक्स ओरिजिनल चित्रपट असून तो दिवाळीपूर्वी प्रदर्शित झाला आहे. राधिका बंसल यांच्या दिग्दर्शनात तयार हा चित्रपट लखनौतील एका भारतीय परिवारातील उलथापालथयुक्त कहाणी आहे.
ट्रेलरची सुरुवात एका सुखक कौटुंबिक ड्रामाच्या स्वरुपात होते. दिवाळीच्या सणानिमित्त परिवाराचे सर्व लोक एका छताखाली एकत्र आलेले असतात, तेथे अनेक पिढ्यांचे रीयुनियन असते. ट्रेलरमध्ये परिवारातील हास्यविनोद, ओढाताण, परंतु अफरातफरी दरम्यान प्रेम अन् दैनंदिन तणावालाही स्पर्श करणारा आहे. भारतीय परिवारांमध्ये कशाप्रकारे ड्रामा असतो आणि कशाप्रकारे जुन्या गोष्टींना मागे सोडून नवी सुरुवात करणे शिकले जाते हे हा चित्रपट दाखवून देतो.
हा चित्रपट नेटफ्लिक्सवर 30 ऑक्टोबर रोजी प्रदर्शित झाला आहे. चित्रपटात ऋत्विक भौमिकसोबत रोहिणी हट्टंगडी आणि आयशा रजा मिश्रा मुख्य भूमिकेत आहे. याचबरोबर तराना राजा, अभय कौल, दलाई, विक्रम बख्शी, शिविका ऋषी, गौरव के. शर्मा, आयुष्मान घई आणि कनिका कपूर देखील दिसून आली आहे.