For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

डिसेंबरअखेर महसूल वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण करा

10:34 AM Jun 17, 2024 IST | Tarun Bharat Portal
डिसेंबरअखेर महसूल वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण करा
Advertisement

जिल्हा पंचायतीच्या ग्रा.पं.ना सूचना : ग्रा.पं. अधिकाऱ्यांची कसरत : ग्रामीण भागातील जनता उदासीन

Advertisement

बेळगाव : ग्रामपंचायत व्याप्तीमध्ये मालमत्तांचे कर वसूल करण्यासाठी ग्रा. पं. अधिकाऱ्यांवर जिल्हा पंचायत अधिकाऱ्यांकडून दबाव घालण्यात येत आहे. 100 टक्के महसूल वसुली करण्यात यावी, अशी सूचना जिल्हा पंचायत अधिकाऱ्यांकडून करण्यात आली आहे. त्यामुळे ग्रा. पं. अधिकाऱ्यांना महसूल वसुलीसाठी कसरत करावी लागत आहे. जिल्हा पंचायतकडून डिसेंबरअखेर शंभर टक्के उद्दिष्ट गाठण्याची सूचना करण्यात आली आहे. सध्या खरीप हंगाम सुरू आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील जनता शेती कामांमध्ये गुंतली आहे. शेतकरी शेती कामात व्यस्त आहे. गेल्या हंगामात शेतकऱ्यांना दुष्काळाचा सामना करावा लागला आहे. दुष्काळ परिस्थितीमुळे शेतकऱ्यांच्या हाती काहीच लागले नाही. पीक नुकसानभरपाई अध्याप अपेक्षेनुसार मिळालेली नाही. अशी परिस्थिती असताना ग्रामपंचायतना 100 टक्के महसूल वसूल करण्याचे उद्दिष्ट दिले जात आहे.

यामुळे ग्रामपंचायत अधिकारी पेचात पडले आहेत. दुष्काळ परिस्थितीमुळे संकटात असणारी ग्रामीण भागातील जनता कर भरण्यास पुढे येत नसल्याने ग्रा. पं. कर्मचाऱ्यांना महसूल वसुलीचे उद्दिष्ट गाठण्यासाठी चांगलीच कसरत करावी लागत आहे. नुकताच झालेल्या जिल्हा पंचायत कार्यालयातील बैठकीत जिल्हा पंचायत विकास विभागाचे उपसंचालक बसवराज अडवीमठ यांनी महसूल वसुलीत मागे असणाऱ्या संबंधित तालुक्यांच्या ग्रामपंचायत अधिकाऱ्यांसह तालुका पंचायत अधिकाऱ्यांना महसूल वसुलीचे उद्दिष्ट गाठण्यासाठी सूचना केली आहे. पंचायत विकास अधिकारी व ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी महसूल वसुलीसाठी पुढाकार घेण्याची सूचना केली आहे. येत्या डिसेंबरपर्यंत शंभर टक्के महसूल वसुलीचे उद्दिष्ट गाठण्याची सूचना केली आहे. ग्रामपंचायत कर्मचारी अथवा स्व साहाय संघाच्या सदस्यांमार्फत महसूल वसूल करण्याची सूचना करण्यात आली आहे. त्यामुळे ग्रामपंचायत विकास अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांना महसूल वसुलीचे उद्दिष्ट गाठण्यासाठी चांगलीच कसरत करावी लागत आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.