For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मीशोचा येणार आयपीओ, 4250 कोटी उभारणार

06:31 AM Jul 01, 2025 IST | Tarun Bharat Portal
मीशोचा येणार आयपीओ  4250 कोटी उभारणार
Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

ई कॉमर्स प्लॅटफॉर्म मीशो यांचा आयपीओ लवकरच शेअर बाजारमध्ये लॉन्च केला जाणार आहे. आयपीओ सादरीकरणासाठी कंपनीला मंजुरी मिळाली आहे. सदरच्या आयपीओअंतर्गत कंपनी 4250 कोटी रुपयांची उभारणी करणार आहे.

विशेष सर्वसाधारण बैठकीमध्ये समभागधारकांनी आयपीओकरिता मंजुरी दिली आहे. कंपनी आयपीओ सादरीकरणासाठी बाजारातील नियामक सेबीकडे अर्ज करणार आहे. याच दरम्यान कंपनीचे सहसंस्थापक विदीत आत्रेय यांना व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ बनवण्याचा निर्णय बैठकीमध्ये सर्वानुमते घेण्यात आला.

Advertisement

इतर गुंतवणूकदार

4250 कोटी रुपयांचा हा आयपीओ असणार असून सध्याचे गुंतवणूकदारही आपली हिस्सेदारी यामध्ये विकणार आहेत. एलिवेशन कॅपिटल, पीक एक्सवी पार्टनर्स आणि प्रोसस यांची या कंपनीमध्ये हिस्सेदारी 13 ते 15 टक्के इतकी आहे. जपानमधील सॉफ्टबँकेची हिस्सेदारी 10 टक्के इतकी आहे.

Advertisement
Tags :

.