For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

‘मीशो’चा आयपीओ खुला

06:38 AM Dec 04, 2025 IST | Tarun Bharat Portal
‘मीशो’चा आयपीओ खुला
Advertisement

किंमत बँड 105 ते 111 रुपये :  पूर्णपणे सबस्क्राइब

Advertisement

मुंबई :

मिशो, एएक्स लिमिटेड आणि विद्या वायर्स लिमिटेड या 3 कंपन्यांचे आयपीओ बुधवारपासून म्हणजेच 3 डिसेंबरपासून बाजारात खुले झाले आहेत.  गुंतवणूकदारांना 5 डिसेंबरपर्यंत गुंतवणूक करण्याची संधी आहे. शेअर्सचे वाटप 8 डिसेंबर रोजी होईल आणि 10 डिसेंबर रोजी बीएसई-एनएसईवर समभाग सुचीबद्ध होतील.

Advertisement

मीशोची आयपीओ किंमत प्रति शेअर 105-111 रुपये निश्चित करण्यात आली आहे. लॉट साईज 135 शेअर्स आहे, म्हणजे किरकोळ गुंतवणूकदारांना 111 दराने किमान 14,685 रुपये गुंतवावे लागतील.

इशू किरकोळ गुंतवणूकदारांनी एका तासात पूर्णपणे सबक्राइब केला. हा इश्यू 5,421 कोटींचा आहे. या आयपीओमध्ये 4,250 कोटींचा नवीन इश्यू आणि 1,171 कोटींची विक्री ऑफर आहे.

निधी एआय आणि क्लाउडसाठी वापरणार

मीशोच्या नवीन इश्यूमधून येणाऱ्या 4,250 कोटींपैकी एक मोठा हिस्सा तंत्रज्ञानासाठी जाईल. मीशो टेक्नॉलॉजीजच्या उपकंपनीसाठी क्लाउड इन्फ्रास्ट्रक्चरवर 1,390 कोटी खर्च केले जातील.

मार्केटिंग-ब्रँडिंगवर 1,020 कोटी खर्च केले जातील. मशीन लर्निंग आणि एआय टीमच्या पगारावर 480 कोटी खर्च केले जातील. उर्वरित रक्कम अजैविक वाढ आणि सामान्य कॉर्पोरेट उद्देशांसाठी आहे. 2015 मध्ये दोन मित्रांनी एका अपार्टमेंटमधून कंपनी सुरू केली. विदित अत्रेय आणि संजीव बरनवाल या दोन मित्रांनी 2015 मध्ये मीशो नावाची कंपनी सुरू केली.

Advertisement
Tags :

.