‘मीशो’चा गुंतवणूकदारांना दुप्पट लाभ
7 दिवसांमध्ये गुंतवणूकदारांचे पैसे डब्बल : 95 टक्क्यांच्या वाढीची नोंद
मुंबई : ई-कॉमर्स कंपनी मीशोच्या शेअर्सनी लिस्टिंगपासून त्यांच्या गुंतवणूकदारांचे पैसे जवळजवळ दुप्पट केले आहेत. कंपनीच्या शेअर्सची इश्यू किंमत 111 पासून सुमारे 95 टक्क्यांनी वाढली आहे. बुधवारी 20 टक्के (36 रुपये) च्या वरच्या सर्किटसह 216.34 रुपयांवर व्यवहार होत आहे. मागील 5 दिवसांत कंपनीच्या शेअर्सनी 27 टक्के परतावा दिला आहे. 10 डिसेंबर रोजी, मीशोचे शेअर्स स्टॉक एक्सचेंज वर 50 टक्के प्रीमियमसह 167 रुपयांवर सूचीबद्ध झाले. दिवसाच्या व्यवहारानंतर ते 170.09 रुपयांवर बंद झाले, 59.09 रुपयांनी वाढले.
मीशोचे सहसंस्थापक अब्जाधीश
कंपनीच्या शेअर्समध्ये झालेल्या या वाढीसह, मीशोचे सह-संस्थापक आणि सीईओ विदित आत्रेय अब्जाधीशांच्या क्लबमध्ये सामील झाले आहेत. 34 वर्षीय विदित 2015 पासून मीशोचे सीईओ आहेत. शेअर बाजारात सूचीबद्ध झाल्यानंतर, कंपनीचे शेअर्स 95 टक्के पर्यंत वाढले, ज्यामुळे त्यांची संपत्ती वाढली. विदित यांच्याकडे कंपनीत 11.10 टक्के हिस्सा आहे ज्यामध्ये 47.25 कोटी शेअर्स आहेत. त्यांची संपत्ती आता 10,222 रुपये (एक अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त) असल्याचा अंदाज आहे.
सहसंस्थापक संजीव बर्नवाल यांच्याकडेही कंपनीत 31.6 कोटी शेअर्स आहेत. त्यांची संपत्ती 6,836 कोटी रुपयांपर्यंत वाढली आहे. विदित यांनी आयआयटी दिल्लीमधून इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये बीटेक केले आहे. त्यांनी आयटीसीमध्येही काम केले आहे. मीशोचा आयपीओ एकूण 5,421 कोटी होता मीशोचा आयपीओ 3 डिसेंबर रोजी उघडला आणि 5 डिसेंबर रोजी बंद झाला. कंपनीने आयपीओसाठी प्रति शेअर105 ते 111 असा किंमत निश्चित केली होती. त्याचे वाटप 8 डिसेंबर रोजी झाले. मीशोचा आयपीओ एकूण 5,421 कोटी होता.