For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

विवाहबंधनात अडकणार मीरा चोप्रा

06:54 AM Jan 01, 2024 IST | Tarun Bharat Portal
विवाहबंधनात अडकणार मीरा चोप्रा
Advertisement

राजस्थानात प्रियकरासोबत सप्तपदी

Advertisement

अभिनेत्री मीरा चोप्रा लवकरच संसार थाटणार आहे. अभिनेत्रीच्या विवाहाची तयारी सुरू झाली आहे. ती स्वत:च्या प्रियकरासोबत फेब्रुवारी महिन्यात विवाहबंधनात अडकणार आहे. हा विवाहसोहळा राजस्थानात पार पडणार आहे.

मीरा सध्या स्वत:चा आगामी चित्रपट ‘सफेद’वरून चर्चेत आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनपासून वेळ मिळाल्यावर ती राजस्थानातील विवाहस्थळ निश्चित करण्यासाठी रवाना होणार आहे. मीराचा प्रियकर हा बॉलिवूड किंवा टीव्ही इंडस्ट्रीतील नसल्याचे समजते. तसेच ती कुणाला डेट करतेय याची माहिती अद्याप समोर आलेली नाही.

Advertisement

मीराच्या सफेद या चित्रपटाचे दिग्दर्शन संदीप सिंह यांनी केले आहे. हा चित्रपट 29 डिसेंबर रोजी झी5 या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. मीरासोबत या चित्रपटात अभय वर्मा आणि बरखा बिष्ट मुख्य भूमिकेत आहेत.  चित्रपटाची निर्मिती विशाल सिंह, जफर मेहदी आणि जूही पारेख मेहता यांनी केली आहे. काही दिवसांपूर्वी मीराने या चित्रपटाचे पोस्टर शेअर केले होते.

Advertisement
Tags :

.