For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणावर मीनाक्षी शिंदेंची भूमिका स्पष्ट; आरोप फेटाळले, पोलिस तपासावर विश्वास व्यक्त

01:43 PM Oct 02, 2026 IST | Tarun Bharat Portal
प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणावर मीनाक्षी शिंदेंची भूमिका स्पष्ट  आरोप फेटाळले  पोलिस तपासावर विश्वास व्यक्त
Advertisement

ठाणे : ठाकरे गटाचे विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्या प्रकरणात आपले नाव घेतले जात असल्याच्या पार्श्वभूमीवर माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली. पूर्णेकर यांच्या हत्येचा तपास पोलिसांकडून सुरू असून तपासातून दोषी कोण हे स्पष्ट होईल, त्यामुळे यापेक्षा अधिक भाष्य करणार नसल्याचे त्यांनी सांगितले.

Advertisement

पूर्णेकर यांच्या कुटुंबीयांकडून मीनाक्षी शिंदे आणि त्यांचे पती राजेंद्र शिंदे यांच्यावर हत्येप्रकरणी आरोप करण्यात आले आहेत. मीनाक्षी शिंदे यांनी हे आरोप फेटाळून लावत, आपल्याविरोधात राजकीय हेतूने आरोप केले जात असल्याचा दावा केला. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू ठेवला असून, आरोपांची सत्यता तपासातून स्पष्ट होणार आहे.

पत्रकार परिषदेत शिंदे यांनी सांगितले की, पूर्णेकर यांची हत्या त्यांच्या प्रभागात झाल्याने या घटनेचे दुःख आहे. मात्र, हत्येनंतर सोशल मीडिया आणि माध्यमांमध्ये आपल्यावर आरोप करण्यात आले. सुरुवातीच्या एफआयआरमध्ये आपले नाव नसल्याचा दावा करत, नंतरच्या पुरवणी जबाबात आपले नाव समाविष्ट करण्यात आल्याचे त्यांनी म्हटले.

Advertisement

यावेळी शिंदे यांनी दिशा सालियन प्रकरणाचाही उल्लेख करत ठाकरे कुटुंबीयांवर प्रश्न उपस्थित केले. त्यांनी या प्रकरणाच्या तपासाबाबत चौकशी आणि कारवाईची मागणी केली. या संदर्भातील त्यांचे आरोप हे त्यांचे राजकीय दावे आहेत.

Advertisement
Tags :

.