For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

30 वर्षांनी पुनरागमन करणार मीनाक्षी शेषाद्री

07:00 AM Aug 07, 2026 IST | Tarun Bharat Portal
30 वर्षांनी पुनरागमन करणार मीनाक्षी शेषाद्री
Advertisement

80-90 च्या दशकातील सुपरहिट अभिनेत्री मीनाक्षी शेषाद्री मागील अनेक वर्षांपासून बॉलिवूडपासून दूर राहिली आहे. ती परदेशात स्थायिक झाली होती, आता मीनाक्षी पुनरागमन करणार आहे आणि तेही 70 वर्षांपूर्वीचे सहकलाकार जॅकी श्रॉफ यांच्यासोबत. मीनाक्षी पुन्हा एकदा जॅकी श्रॉफ यांच्यासोबत काम करणार आहे. मात्र यावेळी ते एका वेबसीरिजसाठी एकत्र आले आहेत. विपुल शाह यांच्या ‘नानावटी व्हर्सेस नानावटी’ या वेबसीरिजच्या माध्यमातून मीनाक्षी पुन्हा अभिनय क्षेत्रात पुनरागमन करणार आहे. या सीरिजद्वार जॅकी श्रॉफ आणि मीनाक्षी यांची जोडी अनेक वर्षांनी प्रेक्षकांना पाहता येणार आहे. दोघे यापूर्वी 1983 मधील सुपरहिट चित्रपट ‘हीरो’मध्ये एकत्र दिसले होते. सीरिजमध्ये मीनाक्षीसोबत भाग्यश्री पटवर्धन, राम कपूर, अनुप्रिया गोयंका देखील मुख्य भूमिकेत असणार आहे. काही दिवसांपूर्वी मीनाक्षी  पुन्हा भारतात स्थायिक झाल्याचे समजते. यावेळी ती अभिनयाच्या कारकीर्दीसाठी मुंबईत कायमस्वरुपी स्थायिक होणार  आहे. या सीरिजच्या माध्यमातून ती ओटीटी प्लॅटफॉर्मवर पदार्पण करणार आहे. 1996 मध्ये प्रदर्शित ‘घातक’ हा मीनाक्षीचा अखेरचा चित्रपट होता. त्यानंतर तिने बँकर हरीश मैसूर यांच्याशी विवाह केला होता आणि दोघे अमेरिकेत स्थायिक झाले होते. मीनाक्षी अमेरिकेत भरतनाट्यामचे प्रशिक्षण देत होत्या.

Advertisement

Advertisement
Tags :

.