मीनाक्षीला मिळाला नवा चित्रपट
श्रीलीलाला केले रिप्लेस
नवीन पोलीशेट्टी दक्षिणेतील प्रतिभावंत अभिनेता आहे. नवीनचा आगामी चित्रपट ‘अनगनगा ओका राजू’चे चित्रिकरण सुरू झाले आहे. पूर्वी हा चित्रपट काही कारणास्तव रद्द करण्यात आला होता. परंतु आता तो पुन्हा निर्माण केला जात आहे. चित्रपटात प्रारंभी श्रीलीलाची अभिनेत्री म्हणून निवड करण्यात आली होती. परंतु मधल्या काळात ती या चित्रपटातून बाहेर पडली होती. यानंतर तिच्या जागी मीनाक्षी चौधरीची निवड करण्यात आली आहे. मीनाक्षी अलिकडेच लकी भास्कर चित्रपटात दिसून आली होती. चित्रपटातील तिच्या अभिनयाचे प्रेक्षकांनी कौतुक केले होते. चित्रपटात दुलकर सलमानने मुख्य भूमिका साकारली होती. या यशानंतर मीनाक्षीला आता आणखी एक चित्रपट मिळाला आहे. नवीन पोलीशेट्टी सोबतच्या या चित्रपटाद्वारे तिच्या कारकीर्दीला नवी भरारी मिळणार अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. मीनाक्षीला नव्या चित्रपटाकडून भरपूर अपेक्षा आहेत.