For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मेदव्हेदेव, स्वायटेक चौथ्या फेरीत दाखल

06:55 AM Mar 11, 2025 IST | Tarun Bharat Portal
मेदव्हेदेव  स्वायटेक चौथ्या फेरीत दाखल
Advertisement

वृत्तसंस्था / इंडियन वेल्स

Advertisement

इंडियन वेल्स मास्टर्स पुरुष आणि महिलांच्या आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत रशियाचा डॅनिल मेदव्हेदेव आणि पोलंडची इगा स्वायटेक यांनी एकेरीची चौथी फेरी गाठली आहे.

महिला एकेरीच्या तिसऱ्या फेरीतील सामन्यात या स्पर्धेतील विद्यमान विजेती इगा स्वायटेकने डायना येस्ट्रीमेस्काचा 6-0, 6-2 अशा सरळ सेटमध्ये पराभव करत चौथ्या फेरीत स्थान मिळविले. हा सामना 65 मिनिटे चालला होता. पोलंडची स्वायटेक महिला टेनिसपटूंच्या मानांकन यादीत दुसऱ्या स्थानावर आहे. तिसऱ्या फेरीतील सामन्यात स्वायटेकने पहिले सलग 10 गेम्स जिंकले. आता स्वायटेकचा चौथ्या फेरीतील सामना झेकच्या कॅरोलिना मुचोव्हाशी होणार आहे. झेकच्या मुचोव्हाने तिसऱ्या फेरीतील सामन्यात आपल्याच देशाच्या कॅटरिना सिनियाकोव्हावर  7-5, 6-1 अशी मात करत चौथी फेरी गाठली आहे. रशियाची 17 वर्षीय मिरा अँड्रीव्हा तसेच 2023 साली या स्पर्धेत जेतेपद मिळविणारी इलिना रायबाकिना यांनीही चौथ्या फेरीत स्थान मिळविले आहे. अँड्रीव्हाने तिसऱ्या फेरीतील सामन्यात डेन्मार्कच्या क्लेरा टॉसनचा 6-3, 6-0 असा फडशा पाडून चौथ्या फेरीत स्थान मिळविले. हा सामना 65 मिनिटे चालला होता. रायबाकिनाने तिसऱ्या फेरीतील सामन्यात ब्रिटनच्या केटी बोल्टरवर 6-0, 6-5 अशी मात केली. अमेरिकेच्या चौथ्या मानांकित जेसीका पेगुलाने तिसऱ्या फेरीतील सामन्यात चीनच्या वेंग झीनयुचा 6-2, 6-1 अशा सेटमध्ये 62 मिनिटांच्या कालावधीत पराभव केला. युक्रेनच्या स्वीटोलिनाने डॅनिली कॉलिन्सचा 6-2, 6-4 असा पराभव केला. पेगुला आणि स्वीटोलिना यांच्यात चौथ्या फेरीचा सामना होईल.

Advertisement

पुरूषांच्या विभागात रशियाच्या मेदव्हेदेवने चौथ्या फेरीत प्रवेश मिळविला आहे. तिसऱ्या फेरीतील सामन्यात त्याचा प्रतिस्पर्धी 22 वर्षीय मिचेल सनने प्रकृती नादुरुस्तीमुळे पहिला सेट चालु असतानाच माघार घेतली. त्यामुळे मेदव्हेदेवला पुढील फेरीत चाल मिळाली. मेदव्हेदेवचा चौथ्या फेरीतील सामना अमेरिकेच्या टॉमी पॉलशी होणार आहे. पॉलने तिसऱ्या फेरीतील सामन्यात ब्रिटनच्या कॅमेरुन नुरीवर 6-3, 7-5 अशी मात केली. तिसऱ्या फेरीतील अन्य एका सामन्यात ग्रीकच्या 18 मानांकित सित्सिपसने इटलीच्या बेरेटेनीचा 6-3, 6-3 असा फडशा 70 मिनिटांच्या कालावधीत पाडत चौथी फेरी गाठली. हॉलंडच्या ग्रीकस्पूरने फ्रान्सच्या पेरीकार्डचा 7-6 (7-3), 6-3 असा पराभव करत पुढील फेरी गाठली. ग्रीकस्पूरने या स्पर्धेत दुसऱ्या फेरीमध्ये ग्रीकस्पूरने जर्मनीच्या व्हेरेव्हचा सरळ सेटमध्ये पराभव केला होता.

Advertisement
Tags :

.