जागतिक शांती आणि एकतेसाठी ध्यान
जागतिक ध्यान दिनानिमित रंकाळा पदपथावर श्री श्री रविशंकर यांचा ऑनलाईन संदेश
कोल्हापूर
आजच्या काळात संघर्षमय जगाला ध्यानाची नितांत आवश्यकता असल्याचे विषद करून,जागतिक शांती आणि एकतेसाठी ध्यान ही यावर्षीची थीम असल्याचा संदेश , परमपूज्य गुरुदेव श्री श्री रविशंकर यांनी जागतिक ध्यान दिनानिमित दिला. संयुक्त राष्ट्र संघ, न्यूयॉर्क येथून साऱ्या जगभर त्यांनी ऑनलाईन ध्यान केले. याचाच भाग म्हणून कोल्हापूरातील आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रशिक्षक आणि स्वयंसेवक यांनी रंकाळा पदपथ येथे सामूहिक ध्यान आणि संगीत संध्या आयोजित केला.
सायंकाळी 7 वाजता स्वागत ऐश्वर्या लोले आणि करण पोवार यांनी केले. संगीत संध्यामध्ये निखिल अग्रवाल आणि राहुल नागवेकर यांनी सुश्राव्य संगीत सादर केले. यानंतर दीप प्रज्वलन युवराज्ञी संयोगिता राजे छत्रपती, महानगरपालिका उपायुक्त राहुल रोकडे, नंदितादेवी प्रवीणसिंह घाडगे, डिंपल गजवानी, पदमनाभ देशपांडे, अनिमा दहिभाते, अजय किल्लेदार ,नेहा हिडदुगी, समीर बसले, संतोष लाड यांनी केले. यावेळी आर्ट ऑफ लिव्हिंगचे विविध लोकोपयोगी सेवा प्रकल्प जगभर सुरु असून याचा व्हिडीओ उपस्थितांना दाखवण्यात आला.
रात्री ठीक 8 वाजता श्री श्री रविशंकर यांनी संयुक्त राष्ट्र संघ, न्यूयॉर्क येथून साऱ्या जगभर ऑनलाईन ध्यान घेतले. जगभरातील 184 देशातील 80 लाख लोकांनी या ज्ञानाचा लाभ घेतला. हे एक जागतिक रेकॉर्ड झाले आहे.
कोल्हापूर जिह्यात कळंबा जेल, बिंदू चौक सबजेल, डी.वाय. पाटील इंजिनीरिंग कॉलेज, विवेकानंद कॉलेज, महावीर कॉलेज, न्यू वुमन्स कॉलेज, पद्माराजे हायस्कूल न्यू एज्युकेशन सोसायटी, संभाजीपुर, जयसिंगपूर आयटी आय कॉलेज, पद्मराजे गर्ल्स हायस्कूल, डी.वाय.पाटील स्कूल राजर्षी छ. शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, शेंडा पार्क,एस.पी. कार्यालय, लोकनेते राजारामबापू पाटील आयुर्वेदिक वैद्यकीय महाविद्यालय, रुग्णालय, ,हसूर-दुमाला ,संभाजीपुर, जयसिंगपूर, कोतोली, इस्लामपूर, हुबळी,पारगाव या ठिकाणी आर्ट ऑफ लिविंग प्रशिक्षकांनी उपस्थितांची ध्यान साधना घेतली.