महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

दिल्लीत वैद्यकीय विद्यार्थ्याची आत्महत्या

06:23 AM Sep 17, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

नीटमध्ये देशात आला होता पहिला क्रमांक

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

दिल्लीच्या मौलाना आझाद वैद्यकीय महाविद्यालयाच्या एका विद्यार्थ्याने आत्महत्या केली आहे. 25 वर्षीय विद्यार्थी नवदीप सिंहने रविवारी रात्री पारसी अंजुमन गेस्ट हाउसमध्ये गळफास लावून घेत आयुष्य संपविले आहे. नवदीपने 2017 मध्ये नीट युजीत पूर्ण देशात पहिला क्रमांक मिळविला होता. सध्या तो रेडियोलॉजीमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेत होता.

2017 मध्ये नवदीपने नीटमध्ये 697 गुणांसह पहिला क्रमांक मिळविला होता. नवदीपच्या पार्थिवावर पंजाबच्या मुक्तसर येथे सोमवारी अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. नवदीप फोन उचलत नसल्याने त्याच्या मित्राला त्याच्याकडे पाठविले होते. परंतु वसतिगृहातील त्याच्या खोलीचा दरवाजा आतून बंद होता. यानंतर दरवाजा तोडल्यावर नवदीपने गळफास लावून घेत आत्महत्या केल्याचे आढळून आल्याचे त्याच्या वडिलांनी सांगितले आहे.

पोलिसांना विद्यार्थ्याच्या खोलीतून सुसाइड नोट मिळालेली नाही. पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत. प्रारंभिक तपासानंतर नवदीपची खोली सील करण्यात आली आहे. पोलिसांनी त्याचा मोबाइल ताब्यात घेत तो फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठविला आहे. आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. यामुळे पोलीस त्याच्या मित्रांकडे चौकशी करत आहेत. मौलाना आझाद वैद्यकीय महाविद्यालयाच्या डॉक्टर्सनी नवदीपच्या मृत्यूबद्दल दु:ख व्यक्त केले आहे. तर महाविद्यालयाकडून या दु:खद घटनेवर शोक व्यक्त करत नोटीसही जारी करण्यात आली आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article