For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सावंतवाडीतही मेडिकल दुकाने बंद

12:36 PM May 20, 2026 IST | अनुजा कुडतरकर
सावंतवाडीतही मेडिकल दुकाने बंद
Advertisement

सावंतवाडी । प्रतिनिधी
अखिल भारतीय औषधी विक्रेता संघटनेच्या (AIOCD) आवाहनानुसार, ऑनलाईन औषध विक्री (E-Pharmacy) आणि कॉर्पोरेट कंपन्यांच्या धोरणांना विरोध करण्यासाठी, सावंतवडीतील सर्व औषध दुकाने (मेडिकल) आज पूर्णपणे बंद आहेत. हा संप २४ तासांचा असून, यामुळे नागरिकांची औषधांसाठी मोठी गैरसोय होत आहे. १९ मेच्या मध्यरात्री १२ वाजल्यापासून ते २० मेच्या मध्यरात्री १२ वाजेपर्यंत जिल्ह्यातील सर्व औषध दुकाने पूर्णपणे बंद राहणार आहे. ऑनलाईन औषध विक्रीवर त्वरित बंदी घालावी, २६ मार्च २०२० ची अधिसूचना केंद्र सरकारने मागे घ्यावी, मोठ्या कॉर्पोरेट कंपन्यांकडून राबवली जाणारी अवास्तव डिस्काउंट धोरणे बंद व्हावीत, बनावट औषधांच्या विक्रीपासून देशातील जनतेला वाचवावे आदी मागण्या यानिमित्ताने करण्यात आल्यात.‌

Advertisement

Advertisement
Tags :

.