वैद्यकीय सेवा व्यवसाय होऊ नये
मिरज :
सांगली राजकारण्यांची पंढरी. तर मिरज आरोग्य पंढरी म्हणून राज्यात ओळखली जाते. मिरजेची ही ओळख महाराष्ट्र आणि कर्नाटकातही लोकप्रिय आहे. ती भविष्यात अशीच टिकवायची असेल तर वैद्यकीय सेवा, वैद्यकीय व्यवसाय होऊ नये, याची दखल येथील वैद्यकीय तज्ञांनी घ्यावी, असे आवाहन राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याणमंत्री प्रकाश आबिटकर यांनी केले. युनिक इन्स्टिट्यूटला महात्मा फुले योजनेसाठी मान्यता देऊ, अशी हमीही त्यांनी यावेळी िदली.
शहरातील 45 नामवंत वैद्यकीय तज्ञांनी एकत्र येऊन सुरू केलेल्या सुमारे 45 कोटी ऊपये खर्चाच्या ‘युनिक इन्स्टिट्यूट ऑफ क्रिटीकल केअर’ या रुग्णालयाचा उद्घाटन समारंभ आज रविवारी सकाळी आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते, आमदार सुरेश खाडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. प्रारंभी युनिकचे चेअरमन डॉ. दिलीप टकले यांनी स्वागत तर कार्यकारी संचालक डॉ. शिरीष चव्हाण यांनी प्रास्ताविक केले.
यावेळी आयुष्यमान भारत मिशनचे राज्याध्यक्ष ओमप्रकाश शेटे, खासदार विशाल पाटील, आमदार इद्रीस नायकवडी, आमदार राजू कागे, जनसुराज्यचे प्रदेशाध्यक्ष समित कदम, पृथ्वीराज पाटील, संजय भोकरे, अजितराव घोरपडे, मकरंद देशपांडे, दिग्विजय सूर्यवंशी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
यावेळी मंत्री आबिटकर म्हणाले, वैद्यकीय तज्ञांमधील सेवाभावी वृत्ती नष्ट होत आहे, अशी खंत व्यक्त करताना रुग्ण आणि वैद्यकीय तज्ञांमध्ये समन्वय गरजेचा आहे. पुण्यात घडलेल्या घटनेनंतर वैद्यकीय सेवा महत्त्वाची की वैद्यकीय व्यवसाय? हा प्रश्न चव्हाट्यावर आला आहे. त्यामुळे येथील वैद्यकीय तज्ञांनी व्यवसायाला बगल देऊन सेवाभाव जोपासला पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त केली. शहरातील अनेक नामवंत वैद्यकीय तज्ञांनी एकत्र येऊन उभे केलेल्या युनिकची संकल्पना कौतुकास्पद आहे. भविष्यात याचा ऊग्णांना फायदा होईल. क्रिटीकल केअरमुळे गंभीर ऊग्णांवरील उपचारासाठी मुंबई, पुण्याला धावपळ करावी लागणार नाही.
रुग्णालयाने मागणी केल्यास महात्मा ज्योतिबा फुले योजनेस तत्काळ मान्यता देउढ, असेही आबिटकर म्हणाले. राज्यात सध्या सार्वजनिक आरोग्य विभागाची यंत्रणा सक्षमपणे कार्यान्वित आहे. तर दुसऱ्या बाजूला खासगी वैद्यकीय तज्ञांच्या माध्यमातून युनिकसारखी अत्याधुनिक यंत्रसामुग्रींनी सुसज्ज ऊग्णालये उभारली जात आहेत. या दोघांमध्ये समन्वय साधून आरोग्य विभागाचे काम गतिमान करण्याचा यानिमित्ताने संकल्प कऊया.
अध्यक्षस्थानावऊन आमदार सुरेश खाडे यांनी सध्या सांगली-मिरजेतील वैद्यकीय तज्ञांना संरक्षणाची गरज असल्याचे बोलून दाखवले. किरकोळ कारणावऊन ऊग्णालयांची नासधूस करतानाचे प्रकार समोर आले आहेत. क्रिटीकल केअर युनिटमुळे आता ऊग्णाला मुंबई-पुण्याला हलविण्याची गरज भासणार नाही. कर्नाटकच्या काही योजना मिरजेच्या ऊग्णालयातही राबविल्या जाव्यात, अशी अपेक्षा व्यक्त केली. आयुष्यमान भारत मिशनचे राज्याचे अध्यक्ष ओमप्रकाश शेटे यांनी युनिकमधून ऊग्ण कमी पैशात बरा होऊन घरी जावा, अशी इच्छा व्यक्त केली. सध्या राज्यात 50 टक्के उपचार दातृत्वावर चालतात. असे सांगताना सर्वांनी संघटीत होऊन सुरू केलेले युनिक कौतुकास्पद आहे. यात वैद्यकीय तज्ञांनी प्रामाणिकपणे ऊग्णसेवा देऊन सांगली-मिरज मेडीकल टाऊनशिप होण्यासाठी हातभार लावावा, असे आवाहन केले. खासदार विशाल पाटील यांनी युनिक येथे गरीब ऊग्णांची अत्यल्प दरात सेवा व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त केली.
या लोकार्पण सोहळ्यास उपसंचालिका डॉ. सानिका प्राणी, डॉ. शबाना मुजावर, डॉ. शिशिर गोसावी, डॉ. रियाज मुजावर, डॉ. भास्कर प्राणी, डॉ. विनोद परमशेट्टी, डॉ. सुरज तांबोळी, डॉ. सोमशेखर पाटील, डॉ. विक्रमसिंह जाधव, डॉ. अमित गाडवे, डॉ. अविनाश पाटील, डॉ. जयधवल भोमाज, डॉ. योगेश जमगे, डॉ. अमित जोशी, डॉ. सुधीर कदम, डॉ. सारंग गोसावी, डॉ. राहुल गोसावी, डॉ. अभिमान पवार, डॉ. अंकिता गोसावी, डॉ. आरती पवार, डॉ. अश्विनी पाटील, डॉ. साबेरा तांबोळी, डॉ. आदिती फले, डॉ. गीता कदम, डॉ. विश्वनाथ पाटील, डॉ. अनुराग चव्हाण, डॉ. रोहित कदम, डॉ. श्रुती परमशेट्टी यांच्यासह वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
- गंभीर रुग्णांसाठी 60 बेड
युनिक इन्स्टिट्यूट 150 बेडचे सुसज्ज ऊग्णालय आहे. यामध्ये केवळ गंभीर ऊग्णांसाठी 60 बेड उपलब्ध केले आहेत. येथे नामवंत वैद्यकीय तज्ञ कार्यरत असणार आहेत. याशिवाय डायलेसिसची सुविधा, सीटी स्कॅन, एक्स-रे लॅबोरेटरी, कॅथलॅब टीम आणि नवतंत्रज्ञानाने युक्त ऑपरेशन थिएटर कार्यान्वित करण्यात आले आहे, अशी माfिहती डॉ. रियाजमुजावर यांनी दिली.