मेधा शंकरला मिळाला नवा चित्रपट
निमरत-सनीसोबत दिसून येणार
अभिनेता सनी कौशल, अभिनेत्री निमरत कौर आणि मेधा शंकर लवकरच एका चित्रपटात दिसून येणार आहेत. हा चित्रपट कॉमेडी धाटणीचा असणार आहे. हे तिन्ही कलाकार पहिल्यांदाच एकत्र झळकणार आहेत. अलिकडेच रोमँटिक थ्रिलर ’फिर आई हसीन दिलरुबा’मध्ये स्वत:च्या अभिनयाने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेणारा सनी कौशल राजस्थानात या चित्रपटाचे चित्रिकरण करत आहे.
या चित्रपटाची निर्मिती लक्ष्मण उतेकर आणि टी-सीरिजकडून केली जात आहे. सनीने मागील वर्षी प्रदर्शित ‘फिर आई हसीन दिलरुबा’ चित्रपटात लक्षवेधी भूमिका साकारली होती. चित्रपटातील त्याच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळाली होती. नेटफ्लिक्सच्या या चित्रपटात तापसी पन्नू आणि विक्रांत मैसीसोबत तो दिसून आला होता.
तर निमरत कौर ही ‘सजनी शिंदे का वायरल वीडियो’मध्ये दिसून आली होती. तसेच ती ‘स्काय फोर्स’ या चित्रपटात अक्षय कुमार अन् सारा अली खानसोबत झळकली होती याचबरोबर ती आगामी काळात ‘सेक्शन 84’ या चित्रपटात दिसून येणार असून यात तिच्यासोबत अमिताभ बच्चन आणि डायना पेंटी मुख्य भूमिकेत आहेत.