पदक विजेत्या झंडू कुमारचा गौरव
06:27 AM Jul 28, 2026 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
वृत्तसंस्था, नवी दिल्ली
Advertisement
ग्लास्गोमध्ये सुरू असलेल्या 2026 च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताला पहिले कांस्यपदक मिळवून देणाऱ्या पॅरा पॉवरलिफ्टर झंडू कुमारचा केंद्रीय क्रीडा मंत्र्यांकडून खास सत्कार करण्यात आला.
राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत झंडू कुमारने पुरूषांच्या हेवीवेट गटात भारताला पहिले कांस्यपदक मिळवून दिले आहे. झंडू कुमार हा बिहारमधील नालंदा जिल्ह्यातील रहिवासी असून तो सामान्य भाजीविक्रेता आणि रिक्षाचालक आहे. केंद्रीय क्रीडामंत्री मनसुख मांडविया यांनी झंडू कुमारचा गौरव करून त्याला 10 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. झंडू कुमारने 2024 आणि 2025 साली झालेल्या खेलो इंडिया पॅरा क्रीडा स्पर्धेत पाठोपाठ अनुक्रमे रौप्य आणि सुवर्णपदक मिळविले होते.
Advertisement
Advertisement