For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कुडाळात 'मी Gen-Z' बॅनरची चर्चा

कुडाळात  मी gen z  बॅनरची चर्चा
Advertisement

कुडाळ / शहर वार्ताहर : दिल्लीतील जंतरमंतर येथे नुकत्याच झालेल्या विद्यार्थी आंदोलनानंतर देशभरात सुरू झालेल्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्गातील कुडाळ शहरात एक अनोखा आणि लक्षवेधी बॅनर झळकला असून, तो सध्या नागरिकांमध्ये चर्चेचा विषय ठरला आहे. शिक्षण, लोकशाही आणि शांततामय भूमिकेचा संदेश देणारा हा बॅनर कुडाळ शहराच्या प्रवेशद्वारावरील काळप नाका परिसरात रस्त्यालगत लावण्यात आला आहे.

Advertisement

बॅनरच्या शीर्षस्थानी "राष्ट्र प्रथम" असा ठळक संदेश देण्यात आला असून, त्याखाली "शिक्षणाचा मान, लोकशाहीचा सन्मान" अशी प्रभावी टॅगलाईन देण्यात आली आहे. पुढे बॅनरच्या एका बाजूला "मी विद्यार्थ्यांच्या पाठीशी आहे", तर दुसऱ्या बाजूला "माझा भारतीय लोकशाहीवर विश्वास आहे" असा संदेश देण्यात आला आहे.

बॅनरवर हातात पुस्तक घेऊन अभ्यास करणाऱ्या एका विद्यार्थीनीचे चित्र असून, तिच्या पार्श्वभूमीला भारतीय संसदेचे छायाचित्र दर्शविण्यात आले आहे. त्यामधून शिक्षण आणि लोकशाही या दोन्ही मूल्यांचा समतोल राखण्याचा संदेश देण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे दिसून येते.

Advertisement

याखाली "मी Gen-Z आहे... मी दोघांच्याही बाजूने आहे" असा ठळक उल्लेख करण्यात आला असून, शेवटी "माझा संकल्प – मी हिंसक जमावाचा भाग बनणार नाही" असा संदेश देत शांततामय, संविधानिक आणि लोकशाही मार्गाने मत व्यक्त करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सध्या हा बॅनर कुडाळ शहरात नागरिकांमध्ये चर्चेचा विषय ठरत असून, अनेकांचे त्याकडे लक्ष वेधले जात आहे.

Advertisement
Tags :

.