For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मियामी ग्रां प्रिमध्ये मॅक्लारेनचा पियास्ट्री विजेता,

06:47 AM May 06, 2025 IST | Tarun Bharat Portal
मियामी ग्रां प्रिमध्ये मॅक्लारेनचा  पियास्ट्री विजेता
Advertisement

वृत्तसंस्था/ मियामी गार्डन्स, फ्लोरिडा

Advertisement

ऑस्कर पियास्ट्रीने येथे झालेल्या फॉर्म्युला वन मियामी ग्रां प्रि शर्यतीचे जेतेपद पटकावले. या मोसमातील सहा शर्यतीपैकी त्याचे हे चौथे जेतेपद आहे. मॅक्लारेनसाठी त्याने सलग तीन शर्यती जिंकल्या आहेत. त्याचाच संघसहकारी नॉरिसने दुसरे तर मर्सिडीजच्या जॉर्ज रसेलने तिसरे स्थान मिळविले.

गेल्या 28 वर्षात सलग तीन एफ वन शर्यती जिंकणारा पियास्ट्री हा मॅक्लारेनचा पहिला ड्रायव्हर आहे. मागील दोन वर्षीही मियामीमध्ये मॅक्लारेनने जेतेपद मिळविले होते. पियास्ट्रीने चॅम्पियनशिप रेसमध्ये त्याचाच संघसहकारी लँडो नॉरिसवरील आघाडी 16 गुणांवर नेली आहे. रेड बुलचा मॅक्स व्हर्स्टापेनने पियास्ट्रीपेक्षा 32 गुणांनी मागे आहे.

Advertisement

विल्यम्सच्या अॅलेक्स अल्बनने पाचवे, मर्सिडीजच्या किमी अँटोनेलीने सहावे, फेरारीच्या चार्लस लेक्लर्कने सातवे, फेरारीच्याच लेविस हॅमिल्टनने आठवे, विल्यम्सच्या कार्लोस सेन्झ ज्युनियरने नववे व रेड बुलच्या युकी त्सुनोदाने शेवटचे दहावे स्थान मिळविले.

Advertisement
Tags :

.