माझगाव डॉकचा तिमाही नफा दुप्पट
696 कोटी रुपयांच्या नफा कमाईसह समभाग 3.5 टक्क्यांनी तेजीत
नवी दिल्ली :
सरकारी जहाज बांधणी कंपनी माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेडला आर्थिक वर्ष 2025 च्या पहिल्या तिमाहीत (जानेवारी-मार्च) नफा वर्षाच्या आधारावर 696 कोटी रुपयांपर्यंत दुप्पट झाला आहे. मागील वर्षीच्या याच तिमाहीत निव्वळ नफा 314 कोटी रुपये राहिला होता. निकालानंतर कंपनीचा समभाग 3.50 टक्क्यांपेक्षा जास्त वाढला आहे. 5,000 च्या वर व्यवहार होत आहे. एका वर्षात माझगाव डॉकच्या शेअरने जवळपास 170 टक्के परतावा दिला आहे.
माझगाव डॉकचा महसूल 8.51 टक्क्यांनी वाढून 2,357 कोटी रुपये झाला आहे. कंपनीच्या कामकाजातून एकत्रित महसूल 2,357 कोटी रुपये होता. त्यात वार्षिक आधारावर 8.51 टक्क्यांनी वाढ झाली आहे. एका वर्षापूर्वी याच तिमाहीत कंपनीने 2172 कोटी रुपयांची कमाई केली होती.
कोचीन शिपयार्डचा नफा 76 टक्क्यांनी वाढला
तत्पूर्वी, कोचीन शिपयार्ड या अन्य जहाज बांधणी कंपनीने त्यांचे तिमाही निकाल जाहीर केले. कोचीन शिपयार्डचा पहिल्या तिमाहीत नफा 76 टक्क्यांनी वाढून 174 कोटी रुपये झाला आहे. वर्षापूर्वी याच तिमाहीत कंपनीला 99 कोटी रुपयांचा नफा झाला होता.
कंपनीच्या कामकाजातून एकत्रित महसूल 771 कोटी रुपये होता. त्यात 62 टक्क्यांनी वाढ झाली आहे. वर्षापूर्वी याच तिमाहीत कंपनीने 476 कोटी रुपयांची कमाई केली होती. वस्तू आणि सेवांच्या विक्रीतून मिळालेल्या रकमेला महसूल म्हणतात.
1774 मध्ये सुरुवात
माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड ही सरकारच्या मालकीची एक अग्रगण्य जहाज बांधणी कंपनी आहे. त्याचा इतिहास 1774 चा आहे, जेव्हा माझगाव येथे एक लहान कोरडी गोदी बांधण्यात आली होती. ती हळूहळू वाढली आणि 1934 मध्ये खासगी लिमिटेड कंपनी म्हणून समाविष्ट करण्यात आली. 1960 मध्ये सरकारने ताब्यात घेतल्यानंतर, माझगाव डॉक वेगाने विकसित झाली आणि पुढे ही कंपनी भारताचे प्रमुख युद्ध-जहाज बांधणी यार्ड बनली. 1960 पासून, माझगाव डॉकने एकूण 801 जहाजे बांधली आहेत. त्यात 27 युद्धनौका आणि 7 पाणबुड्यांचा समावेश आहे.