For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

अॅक्वेटिक स्पर्धेत मयुरेश, युवराजला सुवर्ण

10:39 AM Jan 11, 2025 IST | Tarun Bharat Portal
अॅक्वेटिक स्पर्धेत मयुरेश  युवराजला सुवर्ण
Advertisement

बेळगाव : 35 व्या साउथ झोन डायव्हिंग स्पर्धेत बेळगावच्या डायव्हिंगपटुंनी उत्कृष्ट कामगिरी करताना कर्नाटकाला चॅम्पियनशिप मिळवून दिली. चेन्नई येथील वेल्हाचेरी जलतरण तलावात झालेल्या स्पर्धेत मयुरेश जाधव ग्रुप 1 याने 1 मी. स्प्रिंग बोर्ड डायव्हिंग मध्ये सुवर्ण तर 3 मी.मध्ये तृतीय स्थान पटकाविले. युवराज मोहनगेकर ग्रुप 3 मध्ये 1 व 3 मी. स्प्रिंग बोर्डमध्ये 2  सुवर्णपदके पटकाविले. नील मोहितेने ग्रुप 2 मध्ये 1 व 3 मी. स्प्रिंग बोर्ड डायव्हिंगमध्ये 2 कास्य पदके संपादन केली. तन्वी कारेकरने ग्रुप 3 मध्ये एक मी. स्प्रिंग बोर्ड डायव्हिंगमध्ये चौथा क्रमांक पटकाविला. वरील सर्व जलतरणपटूंना आबा हिंद क्लबचे एनआयएस जलतरण प्रशिक्षक विश्वास पवार, शिवराज मोहिते यांचे बहुमोल मार्गदर्शन लागते.

Advertisement

Advertisement
Tags :

.