For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बसवण कुडचीकडे महापौरांची धाव

11:11 AM Jul 26, 2024 IST | Tarun Bharat Portal
बसवण कुडचीकडे महापौरांची धाव
Advertisement

पाण्याचा निचरा करण्यासाठी केल्या सूचना

Advertisement

बेळगाव : मुसळधार पावसामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे. बसवण कुडची येथे अनेक घरांमध्ये तसेच दुकानांमध्ये पाणी शिरले होते. त्यामुळे तातडीने त्या ठिकाणी महापौर सविता कांबळे यांनी धाव घेतली. केएलईच्या वेलनेस सेंटरमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी गेले. त्या पाण्याला जाण्यासाठी जेसीबीच्या साहाय्याने वाट करून देण्यात आली. महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना त्यासाठी सूचना केली होती. गेल्या चार दिवसांपासून धुवाधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे महानगरपालिकेच्या कामांचा दर्जा असो किंवा नियोजन नसल्यामुळे आता या पावसाने तारांबळ उडवून दिली आहे. अनेक ठिकाणी पाणी शिरून मोठे नुकसान होत आहे. तर रस्तेही उखडून गेले आहेत. बसवण कुडची येथे अनेक ठिकाणी पाणी साचल्यामुळे तक्रारी वाढल्या होत्या. त्यानंतर आता महानगरपालिकेला जाग आली. महापौर सविता कांबळे या स्वत: त्या ठिकाणी दाखल झाल्या. त्यांनी अधिकाऱ्यांना बोलावून पाणी निचरा करण्याबाबत योग्य ते पाऊल उचला, असे सांगितले. त्यानंतरच कामाला सुरुवात झाली आणि पाण्याला वाट करून देण्यात आली.

Advertisement
Advertisement
Tags :

.