Solapur | जनता दरबारमधील तक्रारीची महापौरांकडून दखल; सुर्वेनगरमध्ये सांडपाणी प्रश्नावर केली प्रत्यक्ष पाहणी
महापौर निकम यांनी सुर्वेनगरमध्ये मांडला कामांचा धडाका
कोल्हापूर - कोल्हापूर जनता दरबारमधीलअर्जाच्या अनुषंगाने महापौर रुपाराणी निकम यांनी मंगळवारी सकाळी प्रभाग २० मधील सुर्वेनगर, विद्या-वसंत पार्क (रि.स. नं. ८५३, प्लॉट नं. डी-५) येथे प्रत्यक्ष पाहणी केली. युवराज पाटील यांनी त्यांच्या घराच्या परिसरात अनाधिकृतरीत्या सोडण्यात येणाऱ्या सांडपाण्याबाबत तक्रार अर्ज दाखल केला होता. त्याची दखल घेत महापौरांनी संबंधित जागेवर भेट देत परिस्थितीचा आढावा घेतला.
या भेटीवेळी स्थानिक नगरसेवक अभिजित खतकर, वैभव कुंभार, नगरसेविका नेहा तेंडुलकर तसेच जलअभियंता हर्षजीत घाटगे, उपशहर रचनाकार एन. एस. पाटील, उपशहर अभियंता महादेवफुलारी व कनिष्ठ अभियंता प्रमोद बरालेसह परिसरातील नागरिक उपस्थित होते.
पाहणीदरम्यान महापौरांनी परिसरातील ड्रेनेजलाईन, रस्ते, गटर्स व पाणीपुरवठा व्यवस्थेची पाहणी करून अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली. तक्रारीच्या अनुषंगाने संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून योग्य तो निर्णय घेण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.
अमृत योजनेंतर्गत पिण्याच्या पाण्याच्या, ड्रेनेज लाईनची कामे नवीन ररता करण्यापूर्वी पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी जल अभियंत्यांना दिल्या.अवयवदान उपक्रमात सहभागपाहणीवेळी परिसरातील स्वामी समर्थ केंद्रांतर्गत आयोजित अवयवदान उपक्रमालाही महापौर निकम यांनी भेट दिली.
ओमकार नवनिहाळकर यांच्या पुढाकाराने आयोजित या कॅम्पमध्ये महापौर निकम यांनी स्वतः नाव नोंदवून अवयवदानाचा फॉर्म भरला आणि आपले अवयवदानाचा संकल्प लेखी स्वरूपात व्यक्त केला. या उपक्रमामुळे उपस्थितांमध्ये जागरूकता निर्माण झाली असून नागरिकांकडूनही सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे.