कणकवली शहरातील विकास कामांची नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी केली पाहणी
05:51 PM Jan 03, 2026 IST | अनुजा कुडतरकर
Advertisement
कणकवली/ वार्ताहर
Advertisement
कणकवली शहराचा कायापालट करण्यासाठी नगरपंचायत प्रशासन 'अॅक्शन मोड'वर आले आहे. शनिवारी सकाळी शहरातील विविध रिंगरोड आणि गटार कामांची नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी प्रत्यक्ष पाहणी करून कामात दिरंगाई न करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या. तसेच सुरू असलेली विकासकामे दर्जेदार आणि वेळेत पूर्ण करण्याचा निर्धार संदेश पारकर यांनी व्यक्त केला.
गांगो मंदिर ते रवळनाथ मंदिरपर्यंतच्या रिंगरोडअंतर्गत सुरू असलेल्या गटार, रस्ता व अन्य अपूर्ण कामांची नगराध्यक्ष पारकर यांनी शनिवारी सकाळी पाहणी केली. यावेळी नगरपंचायत अभियंता सचिन नेरकर, ठेकेदार जावेद शेख, तेजस राणे व ग्रामस्थ उपस्थित होते.
Advertisement
Advertisement