Sangli News | सांगली मनपाचा 'अंतिम' डाव! महापौरांच्या तिजोरीतून कोटींची उधळण, पण कोणाचं पारडं जड?
उपमहापौर, सभापती, गटनेत्यांना निधी; सांगली बजेट चर्चेत
सांगली : महानगरपालिकेचा अर्थसंकल्प अंतिम झाला आहे. महापौरांना ११.५० कोटी, उपमहापौरांना ६ कोटी, स्थायी समिती सभापतींना ५ कोटी, सभागृह नेते, विरोधी पक्षनेते, राष्ट्रवादीचे गटनेते यांना प्रत्येकी ३ कोटी, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे गटनेते व शिवसेना गटनेते यांना प्रत्येकी ६० लाख रुपये निधीची तरतूद केली आहे.
स्थायी समिती सदस्यांसाठी विकास निधी हा अन्य नगरसेवक, स्वीकृत नगरसेवक इतका ठेवला आहे. महापौर सूर्यवंशी यांनी अर्थसंकल्प अंतिम केला आहे. अर्थसंकल्पात पदाधिकारी, नगरसेवकांना किती तरतूद केली आहे, याकडे लक्ष लागलेहोते.
स्थायी समितीने महासभेकडे शिफारस केलेल्या अर्थसंकल्पात महापौरांना ५ कोटी, उपमहापौर २ कोटी, स्थायी सभापती ४ कोटी, विरोधी पक्षनेते २ कोटी, गटनेते २५ लाख ते १.५० कोटी, नगरसेवकांना ४.७१ कोटी रुपये विकास निधीची तरतूद केली होती.
आता महापौरांनी अंतिम केलेल्या अर्थसंकल्पात महापौरांना ११.५० कोटी, उपमहापौरांना ६ कोटी, स्थायी सभापतींना ५ कोटी, सभागृह नेते तथा भाजपचे गटनेते यांना ३ कोटी, विरोधी पक्षनेते तथा काँग्रेसचे गटनेते यांना ३ कोटी, गटनेता राष्ट्रवादी यांना ३ कोटी, गटनेता राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष यांना ६० लाख, गटनेता शिवसेना यांना ६० लाख रुपये तरतूद केली आहे. स्थायीतीलप्रत्येक सदस्याला ७२ लाख निधीची तरतूद सूचवली होती. आता अंतिम अर्थसंकल्पात स्थायी समिती सदस्यांना ३० लाख निधीची तरतूद केली आहे.
निधी वाढवला
नगरसेवकांना प्रत्येकी ४.७१ लाख रुपये विकास निधीची तरतूद होती. त्यावर नगरसेवकांनी महासभेत तीव्र संताप व्यक्त केला होता, आता नगरसेवक निधी प्रत्येकी ३० लाख रुपये करण्यात आला आहे, स्वीकृत नगरसेवकांनाही ३० लाखांचा विकास निधी मिळणार आहे.