महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

महापौर-उपमहापौरांचे कक्ष खुले

10:31 AM May 24, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

मात्र एकत्र बसून कोणतीही बैठक न घेण्याची सूचना

Advertisement

बेळगाव : लोकसभा निवडणुकीमुळे आचारसंहिता लागू झाली. या आचारसंहितेमुळे महापौर, उपमहापौर यांचे कक्ष बंद करण्यात आले. लोकसभेसाठी दि. 7 मे रोजी मतदान झाले आहे. मात्र, मतमोजणी 4 जूनला होणार असून त्याला बराच विलंब आहे. त्यामुळे महापौर-उपमहापौरांचे कक्ष खुले करावेत, अशी मागणी करण्यात येत होती. त्यानुसार गुरुवारी महापौर-उपमहापौरांचे कक्ष साफसफाई करून खुले करण्यात आले आहेत.  निवडणूक अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार कक्षांना कुलूप लावण्यात आल्याची माहिती कौन्सिल विभागातून देण्यात आली. मात्र गेल्या काही दिवसांपासून नगरसेवक तसेच महापौर-उपमहापौर यांनी आम्हाला महानगरपालिकेमध्ये आल्यानंतर बसण्यासाठी जागा नाही, अशी तक्रार केली होती. तरीदेखील त्याची दखल घेण्यात आली नाही. मात्र आता अधिक विरोध होत असल्याने गुरुवारी हे कक्ष खुले करण्यात आले आहेत. गुरुवारी या कक्षांची साफसफाई करून ते उघडण्यात आले आहेत. यामुळे समाधान व्यक्त होत आहे. कक्ष खुले केले असले तरी त्या ठिकाणी सर्वांनी एकत्र बसू नये तसेच कोणतीही बैठक घेऊ नये, अशी सूचना महापौर-उपमहापौरांसह नगरसेवकांना देण्यात आली आहे. आचारसंहिता संपल्यानंतरच बैठका तसेच विविध विषयांवर चर्चा करावी, असेही सांगण्यात आले.

Advertisement

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article