For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

महापौर, उपमहापौर निवड 30 रोजी

01:06 PM Mar 21, 2026 IST | Tarun Bharat Portal
महापौर  उपमहापौर निवड 30 रोजी
Advertisement

मनपा आयुक्तांकडून आदेश जारी

Advertisement

पणजी : पणजी महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौर निवडीसाठी सोमवार दि. 30 मार्च रोजी नवनियुक्त मंडळाची पहिली बैठक सकाळी 11 वाजता मनपा सभागृहात आयोजित करण्यात आली आहे. त्यात वरील दोन्ही पदासांठी निवडणूक होणार आहे. मनपा आयुक्त ग्लेन मदेरा यांनी या संदर्भाचा आदेश काढला आहे. दि. 27 मार्चपासून दोन्ही पदासांठी इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज सादर करायचे आहेत. दि. 29 मार्च रविवार असल्याने त्यादिवशी अर्ज स्वीकारले जाणार नाही. त्यामुळे दि. 27 व 28 असे दोनच दिवसांची मुदत अर्जासाठी देण्यात आली आहे. सोमवारी दि. 30 मार्च रोजी दोन्ही पदांची बिनविरोध निवड होण्याची चिन्हे दिसत आहेत. पणजी मनपाच्या 30 पैकी 27 प्रभागात मोन्सेरात गटाचे उमेदवार विजयी झाले असून पर्रीकर गटाचे केवळ 3 उमेदवार निवडून आल्यामुळे दोन्ही पदासांठी मोन्सेरात गटाचे उमेदवार बिनविरोध निवडून येणार हे उघड झाले आहे. तसेच निवडणूक जरी झाली तरी मोन्सेरात गटाचे महापौर-उपमहापौर होणार हे निश्चित आहे.

Advertisement
Advertisement
Tags :

.