महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

राष्ट्रपती होण्यास मायावतींचा नकार

07:00 AM Apr 29, 2022 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

...पण पुन्हा मुख्यमंत्री बनण्याची इच्छा व्यक्त : अखिलेश यादवांवर टीकास्त्र

Advertisement

लखनौ / वृत्तसंस्था

Advertisement

मी पुन्हा एकदा उत्तर प्रदेशची मुख्यमंत्री किंवा पुढील पंतप्रधान होण्याचे स्वप्न पाहू शकते. परंतु राष्ट्रपती होण्याची माझी कधीच इच्छा राहणार नसल्याचे वक्तव्य  उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री आणि बहुजन समाज पक्षाच्या (बीएसपी) प्रमुख मायावती यांनी केले आहे. हे वक्तव्य करताना त्यांनी राष्ट्रपती होण्यास नकार दर्शवला असला तरी पुन्हा एकदा उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदाची इच्छा असल्याचे दिसून येते. राष्ट्रपतीपदाबाबत भाष्य करतानाच त्यांनी समाजवादी पार्टीचे प्रमुख अखिलेश यादव यांनी केलेल्या वक्तव्याचाही खरपूस समाचार घेतला.

उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री आणि बसपच्या राष्ट्रीय अध्यक्षा मायावती यांनी गुरुवारी पत्रकार परिषद घेतली. याप्रसंगी अखिलेश यादव यांच्यावर टीका करताना त्यांनी ते परदेशात पळून जाण्याचा प्रयत्न करत आहेत. मुस्लिमांच्या आजच्या दुरवस्थेला अखिलेश यादव जबाबदार असल्याचे ते म्हणाले. तसेच आगामी काळात यूपीमध्ये दलित-मुस्लीम-मागासांच्या मदतीने बसप सरकार स्थापन करेल, असा दावा मायावतींनी केला.

स्मारकांच्या देखभालीचा मुद्दा सरकारदरबारी

दरम्यान, मायावतींच्या सूचनेनुसार बसपाचे सरचिटणीस सतीशचंद्र मिश्रा आणि आमदार उमाशंकर सिंह यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. बसपा सरकारच्या काळात बांधलेल्या स्मारक-उद्यानांच्या देखभालीची व्यवस्था करण्याची विनंती दोन्ही नेत्यांनी केली. त्यावर मुख्यमंत्र्यांनी लवकरच आवश्यक ती पावले उचलण्याचे आश्वासन दिले.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article