For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

राष्ट्रीय स्पर्धेत मयांकला दोन सुवर्णपदक

10:51 AM Feb 03, 2026 IST | Tarun Bharat Portal
राष्ट्रीय स्पर्धेत मयांकला दोन सुवर्णपदक
Advertisement

बेळगाव : चेन्नई येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय एशिया पॅसिफिक डाऊन सिंड्रोम फेडरेशन आयोजित जलतरण स्पर्धेत मयांक हलदारने भारताचे प्रतिनिधित्व करत दोन सुवर्णपदकांची कमाई केली. सदर जलतरण स्पर्धेत भारतासह इतर दहा देशातील जलतरणपटूंनी भाग घेतला. त्यामध्ये बेळगावच्या मयांक हलदारने भारताचे प्रतिनिधित्व करत दोन सुवर्णपदकांना गवसणी घातली. त्याने 50 मी. फ्रीस्टाईल मध्ये सुवर्णपदक व 25 मी. बॅकस्ट्रोकमध्ये सुवर्णपदक मिळवून बेळगावचे नाव देशात तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर चमकविले. याबद्दल आबा स्पोर्ट्स क्लब व हिंदी स्पोर्ट्स क्लब, क्रीडा भारती बेळगाव यांच्यातर्फे त्याचा बेळगाव रेल्वे स्टेशनवर आगमनाच्या वेळेला सन्मान करण्यात आला. या वेळेला मयांकचे आई-वडील तसेच आबा स्पोर्ट्स क्लबचे जलतरण प्रशिक्षक विश्वास पवार, विशाल वेसने, शुभांगी मंगळूरकर, ज्योती पवार, सुधीर धामणकर, मोहन पत्तार, सूर्यकांत हिंडलगेकर, पद्मप्रसाद हुली, गणेश दडीकर, हर्षाली पाटील, अनंत पाटील व इतर मान्यवर क्रीडाप्रेमी उपस्थित होते

Advertisement

Advertisement
Tags :

.