For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मयांक हळदार याला आशियाई स्पर्धेत सुवर्ण

11:04 AM Feb 05, 2026 IST | Tarun Bharat Portal
मयांक हळदार याला आशियाई स्पर्धेत सुवर्ण
Advertisement

10 देशांच्या स्पर्धकांवर मात करत मिळवले यश

Advertisement

बेळगाव : चेन्नईच्या नेहरू स्टेडियमवर पार पडलेल्या आशियाई पॅसिफिक डाउन सिंड्रोम फेडरेशन गेम्समध्ये मयांक हळदारने जलतरणात दोन सुवर्णपदके जिंकून भारताचा तिरंगा डौलाने फडकवला आहे. या स्पर्धेत मयांकसमोर सोपे आव्हान नव्हते. आशियातील तब्बल 10 देशांमधील नामवंत स्पर्धकांचा या स्पर्धेत सहभाग होता. मात्र, मयांकने आपल्या कौशल्याने सर्वांना थक्क करत यश संपादन केले. 25 मी. बॅकस्ट्रोकमध्ये मयांकने पहिले सुवर्णपदक पटकाविले. त्यानंतर 50 मी. फ्रीस्टाईलमध्ये त्याने दुसरे सुवर्ण घेतले. भातकांडे स्कूलतर्फे त्याचा सत्कार करण्यात आला. यावेळी संस्थेचे अध्यक्ष  मिलिंद भातकांडे यांनी मयांकला पुष्पगुच्छ देऊन त्याचे कौतुक केले. यावेळी  मुख्याध्यापिका दीपा ए. सी., शाझिया जमादार, मीनल हळदार, नागेश हळदार यांच्यासह शिक्षकवर्ग आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Advertisement
Advertisement
Tags :

.