For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

माया टाटा ‘टाटा डिजिटल’मधून बाहेर पडणार

07:00 AM Jun 04, 2026 IST | Tarun Bharat Portal
माया टाटा ‘टाटा डिजिटल’मधून बाहेर पडणार
Advertisement

धोरणात्मक बदलाच्या पार्श्वभूमीवर घेणार निर्णय

Advertisement

वृत्तसंस्था/मुंबई

टाटा डिजिटलमध्ये असणाऱ्या टाटा ट्रस्ट चेअरमन नोएल टाटांच्या कन्या माया टाटा या बाहेर पडण्याचा विचार करत आहेत. कंपनीत धोरणात्मक बदलाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी हा निर्णय घेतला असल्याचे बोलले जात आहे. टाटा समूहातील कंपन्यांमध्ये जबाबदारी घेण्याची तयारी माया टाटा यांनी दर्शवली असल्याचे समजते. यामध्ये ट्रेंट व टाटा कंझ्युमर प्रोडक्टस् यांचा समावेश आहे. टाटा डिजिटलकडे बिग बास्केट, टाटा नेऊ, क्रोमा व टाटा 1 एमजी यांची मालकी असून टाटा सन्सने टाटा डिजिटलमध्ये आतापर्यंत 24 हजार कोटी रुपये गुंतवले आहेत. जर का माया टाटा ट्रेंटमध्ये सामील झाल्या तर त्या बंधू नेवीलसोबत काम करतील, जे स्टार बाजार स्टोरची जबाबदारी पार पाडतात. बहिण लीह या ताजची जबाबदारी पाहतात. नेवील व लीह हे दोघेही त्यांच्या व्यवसायात व्यस्त झाले आहेत. टाटा कॅपिटलमध्ये आल्यानंतर माया या टाटा डिजिटलमध्ये दाखल झाल्या. नोएल टाटा यांची तीन मुले टाटा ट्रस्टच्या मंडळावर  आहेत. नोएल टाटा यांनी व्यवसायातील नुकसानीची चिंता व्यक्त करत एन. चंद्रशेखरन यांच्या पुर्ननियुक्तीबाबत प्रश्न उपस्थित केला होता.

Advertisement

Advertisement
Tags :

.