For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मॅक्सवेल आयपीएल स्पर्धेबाहेर

06:00 AM May 02, 2025 IST | Tarun Bharat Portal
मॅक्सवेल आयपीएल स्पर्धेबाहेर
Advertisement

वृत्तसंस्था / चेन्नई

Advertisement

ऑस्ट्रेलियाच अष्टपैलु ग्लेन मॅक्सवेल हा 2025 च्या आयपीएल क्रिकेट स्पर्धेत पंजाब किंग्ज इलेव्हन संघाचे प्रतिनिधीत्व करीत आहे. दरम्यान मॅक्सवेलच्या हाताच्या बोटाचे हाड मोडल्याने तो आता या स्पर्धेतील उर्वरित सामन्यात खेळू शकणार नाही. दरम्यान मॅक्सवेलची या स्पर्धेतून माघार जवळपास निश्चित असल्याचे सांगण्यात आले. या स्पर्धेतील कोलकत्ता नाईट रायडर्स विरुद्धच्या सामन्यात खेळताना मॅक्सवेलला ही दुखापत झाली होती. या सामन्यात तो केवळ 7 धावांवर बाद झाला होता. पंजाब किंग्ज संघाचा बुधवारी झालेल्या चेन्नई विरुद्धच्या सामन्यात मॅक्सवेलच्या जागी सुर्यानेश शेडगेला बदली खेळाडू म्हणून घेण्यात आले होते. मॅक्सवेलच्या या दुखापतग्रस्त बोटाला प्लास्टर घालण्यात आले असून त्याला आता काही दिवस क्रिकेटपासून अलिप्त रहावे लागेल, असे पंजाब संघाचा प्रशिक्षक पॉन्टींगने सांगितले.

Advertisement
Advertisement
Tags :

.