मॅक्स्वेलला दंड पण कशासाठी?
वृत्तसंस्था / मुलानपूर
2025 च्या आयपीएल क्रिकेट स्पर्धेतील मंगळवारी येथे खेळविण्यात आलेल्या चेन्नई सुपर किंग्ज विरुद्धच्या सामन्यात किंग्ज इलेव्हन पंजाबचा ऑस्ट्रेलियन अष्टपैलु ग्लेन मॅक्स्वेलला आयपीएलच्या शिस्तपालन नियमाचा भंग केल्याबद्दल दंड करण्यात आला. त्याला मिळणाऱ्या मानधनातील 25 टक्के रक्कम दंड म्हणून द्यावा लागणार आहे. दरम्यान मॅक्स्वेलकडून शिस्तपालन नियमाचा भंग कोणत्या कारणास्तव झाला, याबाबत मात्र आयपीएल खुलासा करु शकलेला नाही.
36 वर्षीय मॅक्स्वेलने आयसीसीच्या शिस्तपालन समितीसमोर आपला गुन्हा कबुल केला. मॅक्स्वेलला एक डीमेरीट गुण या गुन्ह्dयाबद्दल देण्यात आला. मुलानपूरमधील पंजाब क्रिकेट संघटनेच्या या नव्या स्टेडियमवर हा सामना खेळविला गेला. दरम्यान या स्टेडियमधील सुविधा तसेच सामन्याच्या वेळेबद्दल मॅक्स्वेलकडून खिल्ली उडविण्यात आल्याचा आरोप आयपीएलच्या शिस्तपालन समितीने केला आहे. मात्र आयपीएलकडून लेखी देण्यात आलेल्या पत्रामध्ये मॅक्स्वेलला कोणत्या कारणास्तव दंड करण्यात आला, याचा खुलासा मात्र केलेला नाही.