For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मॅक्स सीसी-बेळगाव वॉरियर्स आज अंतिम लढत

10:19 AM May 27, 2024 IST | Tarun Bharat Portal
मॅक्स सीसी बेळगाव वॉरियर्स आज अंतिम लढत
Advertisement

राजू दोड्डण्णावर चषक क्रिकेट स्पर्धा

Advertisement

बेळगाव : आनंद क्रिकेट अकादमी आयोजित राजू दोड्डण्णावर चषक 13 वर्षाखालील आंतरक्लब क्रिकेट स्पर्धेत रविवारी खेळविण्यात आलेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात बेळगाव वॉरियर्स संघाने लेकव्ह्यू टायटन्सचा 8 गड्यांनी तर मॅक्स क्रिकेट क्लबने साई फार्म संघाचा 42 धावांनी पराभव करुन अंतिम फेरीत प्रवेश केला. समर्थ तलवार व ओजस गडकरी यांना सामनावीर पुरस्कार देण्यात आला. भगवान महावीर मैदानावर खेळविण्यात आलेल्या पहिल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात लेक व्ह्यू टायटन्स संघाने प्रथम फलंदाजी करताना 15 षटकात 3 गडी बाद 93 धावा केल्या. त्यात सचिन तलवारने 7 चौकारांसह 64 तर समर्थ वाजंत्रीने 10 धावा केल्या. बेळगाव वॉरियर्सतर्फे आरुष व अल्तमश यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. प्रत्युत्तरादाखल खेळताना बेळगाव वॉरियर्सने 13.5 षटकात 2 गडी बाद 97 धावा करुन सामना 8 गड्यांनी जिंकला. त्यात ओजस गडकरीने 2 चौकारांसह 30 तर श्लोक चडीचालने 2 चौकारांसह 24 धावा केल्या. लेक व्ह्यूतर्फे समर्थ वाजंत्री व आयुष शेठ यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. दुसऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्यात मॅक्स क्रिकेट क्लबने प्रथम फलंदाजी करताना 25 षटकात 6 गडी बाद 128 धावा केल्या. त्यात समर्थ चन्नाकेरीने 3 चौकारांसह 38 तर प्रितम रेड्डी ने 12 धावा केल्या. साई फार्मतर्फे विश्रृत कुंदरनाडने 22 धावांत 2 तर साईराज पोरवालने 1 गडी बाद केला. प्रत्युत्तरादाखल खेळताना साई फार्मने 25 षटकात 9 गडी बाद 86 धावा केल्या. त्यात अंश गवळीने 2 चौकारांसह 18, आदर्श गस्तीने 10 धावा केल्या. मॅक्सतर्फे समर्थ तलवार 6 धावात 4 तर नुमान सलिमवालेने 13 धावांत 4 गडी बाद केले.

Advertisement
Advertisement
Tags :

.