Crime News: शिराळा तालुक्यात मटका जुगार जोमात, कर्तेपुरुष मृगजळात
समाजात एक वेगळा मान, असा न्युनगंड येथील तरुण पिढीत रुजतोय
By : प्रितम निकम
शिराळा : शिराळा तालुक्यात गावोगावी मटका जुगार व्यवसाय जोमात तर पोलिस प्रशासन मात्र कोमात अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. शिराळा शहरासह आसपासच्या मोठ्या गावात शेकडो मटका बुकी टपऱ्या असूनही प्रशासकीय अधिकाऱ्यांची हाताची घडी आणि तोंडावर बोट भुमिका कायम आहे.
शिराळा शहरातील मटण मार्केटसह गल्लोगल्लीमध्ये ठेसला भटका बुकीच्या टपऱ्या अनेक कुटुंबे उद्ध्वस्त करत आहेत. राजकीय नेत्यांनी अशा अवैध धंद्यावर मौन बाळगले आहे. मटका व्यवसाय करणे म्हणजे मी मोठा कोणीतरी आहे. मला समाजात एक वेगळा मान आहे असा न्युनगंड येथील तरुण पिढीत रुजत आहे.
त्यामुळे अनेक तरुण कष्टाची कामे सोडून अशा अवैध व्यवसायाकडे वळत आहेत. मात्र तरुण वर्गात मटका जुगार व्यवसायाची क्रेझ वाढत चालली आहे. पोलिस प्रशासन याकडे दुर्लक्ष करत डोळे मिटून शांत का आहे असा सवाल सामान्य जनतेकडून व पालक वर्गातून विचारला जात आहे.
एकीकडे कधीतरी वर्षा-सहा महिन्यात पंटरवर एखादी जुजबी कारवाई करुन मटका जुगार बंद असल्याचे भासवले जात आहे. तर दुसरीकडे आमचा व्यवसाय पहिल्यापेक्षा चांगला सुरू असल्याची चर्चा मटका व्यावसायिकांकडून सांगितली जात आहे. शिराळा तालुक्यात पोलिस प्रशासनाच्या आशिर्वादाने क्लोज-ओपन मटका व्यवसाय तेजीत सुरू आहे.
शहरासह तालुक्यात पालक व महिलांवर्गात काळजीचे वातावरण आहे. अनेक दिवसांपासून मटका व्यावसायिकांनी आपला गाशा गुंडाळला होता. आता पुन्हा मटका व्यवसायिक डोकं वर काढू लागल्याने नवीन पिढी पुन्हा जुगाराच्या विळख्यात सापडत चालल्याने ग्रामस्थांमध्ये व महिला वर्गात संताप व्यक्त केला जात आहे.
संबंधित प्रशासनाने याची सखोल चौकशी करून योग्य ती पाऊले वेळीच ऊचलण्याची मागणी जनतेमधून होत आहे. शिराळा पोलिस ठाण्याने सर्वोच्च पोलिस ठाणे म्हणून देशात सातवा तर महाराष्ट्रात पहिला 399 बहुमान मिळाला आहे. परंतु सध्या देशात नावलौकिक मिळविलेल्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत शिराळा पोलिस ठाण्याच्या कृपाशिर्वादाने मटका किंगनी शहरासह तालुक्यात गावोगावी पंटर नेमून आपले
मटकाबुकीचे जाळे तयार केले आहे. शासनाने मटका व्यवसायावर पुर्णपणे बंदी घातलेल्या क्लोज ओपनं मटकाबुकीचे दरवाजे पुन्हा ओपन होत असल्याने मटका खेळणाऱ्यांमध्ये समाधान तर सर्वसामान्य कुटुंबातील महिला अबालवृद्धांमध्ये संताप अशी स्थीती आहे. शिराळा तालुका हा डोंगरी तालुका म्हणून ओळखला जातो. तालुक्यातील लोकांना शेती शिवाय पर्याय नाही.
तालुक्यातील शेतीहि कोरडवाहुच आहे. त्यामुळे शेती उत्पन्न तुटपुंज व कमी असून पावसाच्या पाण्यावर शेती अवलंबून असल्याने तालुक्यातील अनेकजण कुटुंबाच्या पोटाची खळगी भरण्यासाठी मिळेल ती मोलमजुरी करण्यासाठी पुण्यामुंबई शहराकडे धावत आहेत. जवळपास अठरा ते वीस वर्षापूर्वी सांगली जिल्ह्याचे जिल्हा पोलीस प्रमुख कृष्णप्रकाश यांनी सांगली जिल्ह्यात हातभट्टीची गावटी अवैध दारु व जुगार अड्यांवर जिल्हा हातभट्टी दारू व अवैध मटका, जुगार मुक्त केला होता.
शिराळा तालुक्यात पैशाचा बाजार मांडणारा जुगार हा खेळ नामशेष झाला आहे. तर आजच्या म्हणजे काय ? हे ही माहिती नाही. अनेक कर्तेपुरुष या मृगजळात वाया गेल्याचे तसेच घरादाराचे लिलाव झाल्याचं जाणकार सांगतात.
50 तरुण पिढीला क्लोज ओपन मटका
विशेषतः शिराळा, मांगले, सागावं, चरण, कोकरूड, आरळा आदी गावात सध्या क्लोज ओपन मटक्याने पुन्हा डोके वर काढतं हा धंदा दिमाखात चालू आहे. याबाबत सुरेश खाडे यांनी ही मटका व्यवसायासह अवैध व्यवसायिकांवर कडक कारवाईचे आदेश दिले आहेत. शिराळा पोलिसंनी वेळीच अशा अपप्रवृत्तींना आळा घालणे गरजेचे आहे. अशी मागणी जनतेतून होत आहे.