For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

वाढत्या उन्हामुळे माठांना पसंती

10:41 AM Mar 30, 2024 IST | Tarun Bharat Portal
वाढत्या उन्हामुळे माठांना पसंती
Advertisement

तापमानवाढीचा परिणाम : बाजारात रंगीबेरंगी माठांचे आकर्षण

Advertisement

बेळगाव : दिवसेंदिवस उन्हाचा पारा वाढू लागला आहे. त्यामुळे नागरिकांच्या शरीराची लाहीलाही होऊ लागली आहे. अशा परिस्थितीत गरिबांचा फ्रीज म्हणून ओळखल्या जाणाऱ्या माठांना मागणी वाढू लागली आहे. बाजारात आकर्षक विविध आकारांमध्ये माठ दाखल झाले आहेत. थंडगार पेयांबरोबर मातीच्या माठांनाही पसंती मिळू लागली आहे. त्यामुळे माठ विक्रीची लगबग पहावयास मिळत आहे. उन्हाचा तडाखा वाढला असून, पारा 36 अंशांच्या पुढे गेला आहे. त्यामुळे थंडगार पेयांना आणि रसाळ फळांनाही पसंती मिळू लागली आहे. त्याबरोबर तहान शमविण्यासाठी माठांची खरेदीही होऊ लागली आहे. 300 रुपयांपासून 700 रुपयांपर्यंत विविध आकारांमध्ये माठ उपलब्ध आहेत. 8 लिटरपासून 18 लिटरपर्यंत नळाचे माठही विक्री होऊ लागले आहेत. मातीचे आणि विविध रंगांमध्ये माठ नागरिकांना आकर्षितही करू लागले आहेत.

फ्रीजचा दर अधिक असल्याने माठ खरेदीला पसंती

Advertisement

मागील काही दिवसांपासून हळूहळू उष्म्यात वाढ होऊन शहर तापू लागले आहे. त्यामुळे नागरिकांची पावले थंड पेयांबरोबर माठाकडे वळू लागली आहेत. फ्रीजचा दर अधिक असल्याने काही जण माठ खरेदीलाही पसंती देत आहेत. किरकोळ बाजारात माठ, बॉटल, जग, नळ नसलेले माठही उपलब्ध करण्यात आले आहेत. विशेषत: गुजरात, अहमदाबाद, पश्चिम बंगाल आणि खानापूर तालुक्यातूनही विविध आकारांमध्ये माठ दाखल झाले आहेत. स्थानिक काळ्या माठांबरोबर रंगीबेरंगी माठही दिसून येत आहेत. वाढत्या उन्हामुळे या माठांची विक्री वाढली आहे.

Advertisement
Tags :

.