मातृत्वाची रजा 9 महिने होणार? व्ही. के. पॉल
भारतात महिलांना मिळणाऱ्या प्रसूती रजेचा कालावधी हा 6 महिन्यांचा आहे. तो कालावधी वाढून नऊ महिन्यांचा करावा अशी सूचना निती आयोगाचे सदस्य व्ही. के. पॉल यांनी केलीय. तसेच केंद्र सरकारने खासगी आणि सरकारी संस्थांना या सूचना द्यावेत अशी शिफारसही त्यांनी केलीय. महिलांना गरोदरपणात स्वत:ची आणि आपल्या बाळाची देखील जास्त काळजी घ्यावी लागते.त्यामुळे प्रसूती रजेचा कालावधी वाढवण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितलयं.हा निर्णय खासगी संस्थेला बंधनकारक नाही. मात्र खरचं अस झाल तर… कायदा काय सांगतो आणि फिक्की संघटनेच काय म्हणणं आहे हे आज आपण जाणून घेणार आहोत.
भारतीय व्यापार आणि उद्योग महासंघ अर्थात(फिक्की) मधील महिला संघटनेनं एक निवेदन जारी केलेय. यामध्ये व्ही.के.पॉल यांच्या हवाल्याने म्हटले की, प्रायव्हेट आणि पब्लिक सेक्टर्समध्ये प्रसूती रजा वाढवून ती 6 महिन्यांऐवजी 9 महिने करण्याबाबत विचार करणे गरजेचे आहे. पिक्कीच्या अध्यक्षा सुधा शिवकुमार यांनी देखील पॉल यांच्या मागणीवर भाष्य केलंय. त्या म्हणतात, भारतात आस्थापनांतील कर्मचाऱ्यांच्या काळजीकडे दुर्लक्ष केलं जातं,इतर देशांच्या तुलनेत,भारतात कर्मचाऱ्यांची काळजी घेण्यात अभाव जाणवतो,असं त्या म्हणाल्या.यावर मुलांची योग्य काळजी घेण्यासाठी खासगी क्षेत्राने शिशुगृह अर्थात नर्सरी उघडण्याची गरज असल्याचे पॉल यांनी म्हटलय.
2017 साली संसदेमध्ये मातृत्वाबाबत एक दुरूस्ती विधयक करण्यात आले, त्यानुसार महिला कर्मचाऱ्यांना पहिल्या दोन अपत्यांसाठी प्रसूती आणि मातृत्वाची रजा 12 आठवड्यांवरून 26 आठवडे करण्यात आली.त्यानंतरच्या अपत्यांसाठी फक्त 12 आठवडे रजा मिळू शकते. याशिवाय 3 महिन्यांखालील बाळ जर कोण दत्तक घेत असेल तर त्या मातेलाही 12 आठवड्याची रजा या कायद्यामुळे मिळाली.50 पेक्षा जास्त कर्मचारी असलेल्या कंपन्यांनी पाळणाघराची व्यवस्था करावी.कामाच्या दरम्यान चार वेळेला बाळाला बघण्याची परवानगी द्यावी.शक्य त्या महिलांना वर्क फ्रॉम होम द्यावे अस या कायद्यात सुचवण्यात आलयं.
दरम्यान, केंद्र सरकारची धोरण ठरवणाऱ्या व्ही. के. पॉल यांनी मातृत्वाची रजा 9 महिन्याची असावी अस म्हटलयं. तसेच खासगी क्षेत्रातील कंपन्यांनी महिला कर्मचाऱ्यांच्य़ा मुलांसाठी आपल्या ऑफिसमध्ये बालसंगोपन केंद्र सुरु करावे. तसेच लहान मुले आणि वयोवृध्द लोकांच्या देखभालीसाठी काही सुविधा उपलब्ध करून देण्याचे पाऊल कंपन्यांनी उचलायला हवे असंही पॉल यांनी म्हटलयं.
प्रसूती रजेचा कालावधी 9 महिन्यांचा झाला तर आई आणि बाळ या दोघांचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होते. बरेचदा बाळ लहान असल्याने महिला ऑफिसला येण बंद करतात. मात्र या निर्णयामुळे अनेक महिलांच्या करिअरचा मार्ग मोकळा होणार आहे. मात्र ही रजा पगारी असल्याने खासगी क्षेत्रात इतक्या रजा देतील का असा प्रश्न उपस्थित होतोय.