महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

बांधकामाच्या ठिकाणावरून ७५ हजाराचे साहित्य लंपास

12:29 PM Aug 16, 2024 IST | Abhijeet Khandekar
Advertisement

सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल

सांगली प्रतिनिधी

कसबे डिग्रज (ता. मिरज) येथील चव्हाण प्लॉटमध्ये बांधकामाच्या ठिकाणावरून पाऊण लाखाचे वायरिंगचे साहित्य चोरट्याने लंपास केले. याबाबत रोहत अरूण डिसले (वय 31, रा. कसबे डिग्रज) यांनी सांगली ग्रामीण पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Advertisement

अधिक माहिती अशी, रोहित डिसले हे हॉटेल व्यवसायिक आहेत. कसबे डिग्रज कमान ते गावात जाणाऱ्या रस्त्यावर चव्हाण प्लॉटमध्ये नवीन बांधकाम सुरू आहे. बांधकामाच्या ठिकाणी घरात वायरिंगचे बॉक्स ठेवले होते. चोरट्याने घराचे कुलूप तोडून आतमध्ये प्रवेश करून वायरचे पाऊण लाखाचे बॉक्स लंपास केले. बुधवारी सकाळी 9 वाजता हा प्रकार निदर्शनास आला. त्यानंतर डिसले यांनी सांगली ग्रामीण पा†लस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Advertisement

Advertisement
Tags :
Materials worth 75 thousand were stolenSangli crime
Next Article