महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

गणपत गल्ली येथील स्वीट मार्टमधील साहित्य जप्त

11:23 AM Apr 07, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

महानगरपालिकेची कारवाई

Advertisement

बेळगाव : गणपत गल्ली येथील महानगरपालिकेच्या गाळ्यामध्ये पुरोहित स्वीट मार्ट होते. तो गाळा लिलाव करण्याचे आदेश न्यायालयाकडून आले. त्यानंतर संबंधित मालकाला नोटीस बजावण्यात आली होती. दुकानातील साहित्य खाली करावे, असेही सांगण्यात आले होते. मात्र, मालकाने दुकानातील साहित्य खाली केले नाही म्हणून महानगरपालिका आयुक्त पी. एन. लोकेश यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल विभागाने स्वीट मार्टमधील संपूर्ण साहित्य जप्त केले आहे. रात्री उशिरापर्यंत ही कारवाई सुरू होती. महानगरपालिकेचा गणपत गल्ली येथे गाळा होता. त्या गाळ्याची लीज संपली होती. त्यानंतर संबंधित गाळा मालकाने न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयानेही त्यांची याचिका फेटाळून तो गाळा महानगरपालिकेने ताब्यात घ्यावा, असा आदेश दिला असल्याचे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. न्यायालयाच्या आदेशानुसारच ही कारवाई केल्याचे देखील स्पष्ट करण्यात आले आहे. एक महिन्यापूर्वी या स्वीट मार्टला टाळे ठोकण्यात आले होते. त्यानंतर संबंधित गाळेमालकाला साहित्य खाली करून गाळा द्यावा, अशी नोटीस बजावण्यात आली होती. त्यानंतर देखील संबंधित मालकाने त्याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे महापालिका आयुक्तांनी ही कारवाई करण्याची सूचना केली. त्यानुसार कायदा सल्लागार अॅड. उमेश महांतशेट्टी, महसूल विभागाचे फारुख यड्रावी, मार्केट विभागाचे महसूल निरीक्षक नंदू बांदिवडेकर, सुरेश हळ्ळूर यांच्यासह इतर कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली आहे. यावेळी मालकांनी मात्र त्याला विरोध केला. सदर कारवाई ही बेकायदेशीर असून त्या विरोधात न्यायालयात आम्ही दाद मागू, असे त्यांनी सांगितले आहे.

Advertisement

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article