महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

हलगा-मच्छे बायपास रस्त्यासाठी यंत्र सामग्री दाखल

11:59 AM Oct 08, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

बेळगाव : हलगा-मच्छे बायपास रस्त्याचे काम करण्यासाठी पुन्हा कंत्राटदारांनी अलारवाड क्रॉसजवळ यंत्रसामुग्री जमा केली आहे. यामुळे शेतकऱ्यांतून संताप व्यक्त करण्यात येत आहे. गेल्या 14 वर्षापासून हे प्रयत्न सुरू आहेत. त्याला शेतकऱ्यांनी विरोध करूनही अट्टहास सोडला जात नाही. सध्या न्यायालयाने स्थगितीही उठविली  आहे. मात्र या रस्त्यामधील गेलेल्या जागेचे मालक राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण झाले नाही. त्यामुळे रस्ता केला तरी भविष्यात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकार अडचणीत येणार हे निश्चित आहे. उच्च न्यायालयाने स्थगिती उठविली आहे. त्यामुळे कंत्राटदार पुन्हा रस्ता करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप होत आहे. याप्रकारामुळे शेतकरी संतप्त झाले आहेत. सध्या शेतामध्ये पिके आहेत. त्यामध्ये जर यंत्र सामग्री घालून नुकसान केल्यास शेतकरी गप्प बसणार नाही असा इशारा दिला आहे. अलारवाड क्रॉस येथे जेसीबीसह इतर यंत्र सामग्री तैनात करण्यात आली आहे. त्यामुळे कंत्राटदार हा रस्ता करण्याच्या तयारीत आहेत.

Advertisement

तोपर्यंत रस्ता करू नये 

Advertisement

सध्या उच्च न्यायालयात शेतकऱ्यांचा एक अर्ज प्रलंबित आहे. जोपर्यंत 0 पाईंट निश्चित केले जात नाही. तोपर्यंत रस्ता करू नये अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने प्रथम 0 पाईंट निश्चित करावा, त्यानंतरच हा रस्ता करावा असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. मात्र रस्ता करण्याच्या तयारीला राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण लागले आहे, असे दिसून येत आहे.

रस्ता केला तरी त्याचा काहीच उपयोग होणार नाही

न्यायालयाने शेतकऱ्यांची स्थिगीती उठविली आहे. त्यामुळे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण रस्ता करेल पण भविष्यात पुन्हा हा रस्ता बंद करावा लागणार हे निश्चित आहे. सध्या शहरामध्ये ज्याप्रकारे रस्ता बंद करावा लागला आहे. त्याचप्रकारे हाही रस्ता एक दिवस बंद करावा लागणार असे, अॅड. रवीकुमार गोकाककर यांनी सांगितले आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article