कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

13 जानेवारी रोजी मसुरे केंद्र शाळेचे स्नेहसंमेलन

04:52 PM Jan 12, 2024 IST | अनुजा कुडतरकर
Advertisement

मसुरे प्रतिनिधी

Advertisement

मसुरे येथील श्री दाजी साहेब प्रभू गावकर केंद्र शाळा मसुरे नंबर १ या शाळेचे स्नेहसंमेलन शनिवार दिनांक 13 जानेवारी रोजी विविध उपक्रमाने होत आहे. यावेळी सकाळी साडेनऊ वाजता ईशस्तवन, स्वागत, प्रास्ताविक, हस्तलिखित प्रकाशन, बक्षीस वितरण, मान्यवरांचे सत्कार समारंभ. सायंकाळी पाच वाजता स्नेहसंमेलन उद्घाटन आणि श्री दाजी साहेब प्रभुगावकर केंद्र शाळा मसुरे नंबर एक च्या विद्यार्थ्यांचे विविध गुणदर्शन पर सांस्कृतिक कार्यक्रम. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष संग्राम प्रभू गावकर, उद्घाटक संदीप हडकर, प्रमुख पाहुणे सरोज परब, विशेष मान्यवर राजेश गावकर, महेश बागवे, सौ गायत्री ठाकूर,श्री संजय माने, श्री नारायण देशमुख, श्री दत्तप्रसाद पेडणेकर, सौ लक्ष्मी पेडणेकर, सन्मेष मसुरेकर, धनंजय सावंत, शिवराज सावंत आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. यावेळी सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन या प्रशालेच्या उच्चश्रेणी मुख्याध्यापिका शर्वरी सावंत, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सौ शितल मसुरकर आणि केंद्रशाळा मसरे नंबर १ च्या वतीने करण्यात आलेले आहे.

Advertisement

Advertisement
Tags :
# tarun bharat news # masure #
Next Article