Satara News : बांधकाम विभागाच्या धोरणाबाबत आक्षेप
11:54 AM Jun 13, 2026 IST | NEETA POTDAR
Advertisement
पाटण-पंढरपूर राज्यमार्ग अरूंद करण्याचा प्रयत्न मसूर ग्रामस्थांचा आरोप
Advertisement
मसूर : मसूर गावातून जाणाऱ्या पाटण-पंढरपूर राज्य महामार्गाच्या कामात गेल्या दोन महिन्यांपासून सुरू असलेल्या कामाबाबत ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. मसूर गावातून मुख्य चौकापासून ते वाघेश्वर पर्यंतच्या रस्त्याबाबत काही खोडसळ व्यक्तींकडून रस्ता अरुंद करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप करत ग्रामस्थांनी पत्रकार परिषद घेऊन प्रशासन व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या बदलत्या धोरणाबाबत आक्षेप घेतला.
मसूर हद्दीत बांधकाम विभागाच्या अंदाजपत्रकानुसार रस्त्याच्या मध्यापासून १२ मीटर दक्षिण व १२ मीटर उत्तर अशी २४ मीटर रुंदीने रस्ता व नाला बांधकाम करणे अपेक्षित आहे. मात्र प्रत्यक्षात मुख्य जुना एसटी चौकात जाणीवपूर्वक रस्ता अरुंद करण्याचा घाट घातला जात असल्याचे दिसून येत आहे.
यामुळे गावातील वाहतूक कोंडी अधिक गंभीर होणार असल्याचा ग्रामस्थांचा दावा आहे. पाटण-पंढरपूर म्हणजेच मसूर शामगाव रस्त्याच्या दोन्ही बाजूला पूर्वीच पक्के गटार बांधलेले आहेत. त्याच गटरवर गटार बांधून मंजूर अंदाजपत्रकानुसार रुंद रस्ता करावा.
यात कोणत्याही प्रकारचे नुकसान होत नाही, किंवा तशी कोणाचीही तक्रार नाही. उलट मसूरच्या बाजारपेठेला मोठा फायदा होईल. असे असतानाही त्यास जाणीवपूर्वक फाटा देण्यात येत आहे व त्यामुळे अतिक्रमण करण्यास वाव मिळत आहे .
ग्रामस्थांनी मागणी केली की, अंदाजपत्रकाप्रमाणे सुरू असलेले काम दर्जेदार, टिकाऊ आणि पुढील ५० वर्ष टिकणारे हवे. कसलाही पक्षपात न करता सर्वांना समान न्याय द्यावा. त्यात कोणत्याही प्रकारची तडजोड केली जाणार नाही. शासकीय जागेवर असलेले अतिक्रमण संबंधित विभागाने तातडीने हटवावे, अन्यथा येणाऱ्या काळात तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा दिला आहे.
यावेळी माजी उपसरपंच संजय शिरतोडे, संभाजी जगदाळे, संदेश जगताप, विनोद जगदाळे, बंडा दळवी, अभिजीत कारणे, दत्ता यादव, साहील मुल्ला, अरमान मोमीन, शिवाजी काळे, विजय खिल्लारे, सतीश शेजवळ, विकास जाधव, दीपक मोरे, जनार्दन जमदाडे, संतोष कोरडे, सुरेश काशीद, गणेश कदम, राजेंद्र लोहार, दादा घोलप, सोमनाथ चौधरी, संजय पाटोळे, वैभव पोकळे आदीसह ग्रामस्थ उपस्थित होते.
तीव्र आंदोलनाचा इशारा
ग्रामस्थांनी सार्वजनिक बांधकाम विभाग व जिल्हा प्रशासनाचे लक्ष वेधले असून, कोणाच्या दबावापोटी कामे न करता मसूरच्या विकासात अडथळा आणणाऱ्या शक्तींना वेळीच रोखले नाही तर भविष्यात मोठ्या आंदोलनाला सामोरे जावे लागेल, असा इशारा देण्यात आला आहे. सातत्याने भ्रष्ट कारभार आणि खोट्या आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर मसूर ग्रामस्थ एकजुटले आहेत.
ग्रामस्थांनी सार्वजनिक बांधकाम विभाग व जिल्हा प्रशासनाचे लक्ष वेधले असून, कोणाच्या दबावापोटी कामे न करता मसूरच्या विकासात अडथळा आणणाऱ्या शक्तींना वेळीच रोखले नाही तर भविष्यात मोठ्या आंदोलनाला सामोरे जावे लागेल, असा इशारा देण्यात आला आहे. सातत्याने भ्रष्ट कारभार आणि खोट्या आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर मसूर ग्रामस्थ एकजुटले आहेत.
Advertisement