मस्ती 4 21 नोव्हेंबरला झळकणार
थामा चित्रपटाचे पेलावे लागणार आव्हान
मीत, प्रेम आणि अमर या तीन मित्रांची कहाणी दाखविणारा चित्रपट मस्ती 2004 साली प्रदर्शित झाला होता. आता या फ्रेंचाइजीचा चौथा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मस्ती 4 हा चालू वर्षाती सर्वात बहुप्रतीक्षित चित्रपटांपैकी एक असून यात विवेक ओबेरॉय, रितेश देशमुख आणि आफताब शिवदासानी यांची जोडी पुन्हा पाहता येणार आहे. हा चित्रपट 21 नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे. निर्मात्यांनी या चित्रपटाच्या नव्या पोस्टरसह प्रदर्शनाची तारीख जाहीर केली आहे. कलाकारांनी देखील हे पोस्टर स्वत:च्या इन्स्टाग्राम हँडलवर शेअर केली आहे. या चित्रपटाच्या पोस्टरवर अनेक चाहत्यांनी कॉमेंट करत स्वत:ची उत्सुकता दर्शवून दिली आहे. मस्ती फ्रेंचाइजी स्वत:च्या बोल्ड डायलॉगसाठी ओळखली जात असल्याने त्याचा वेगळा चाहतावर्ग आहे.विवेक ओबेरॉय, रितेश देशमुख आणि आफताब शिवदासानी यांच्यासोबत या कॉमेडी ड्रामामध्ये अरशद वारसी देखील दिसून येणार आहे. मस्ती 4 चित्रपटात जेनेलिया डिसूजा, एलनाज नौरोजी, श्रेया शर्मा आणि रुही सिंह या अभिनेत्रीही मुख्य भूमिकांमध्ये आहेत. चित्रपटाचे चित्रिकरण ब्रिटनमध्ये 40 दिवसांमध्ये पूर्ण करण्यात आले आहे.