कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

अपंगत्वावर मात करत शैलेश सावंत यांचा थक्क करणारा प्रेरणादायी प्रवास

04:35 PM Jun 03, 2025 IST | अनुजा कुडतरकर
Advertisement

पेंडूर घोडेमुखचे सुपुत्र ; हार्मोनियम कलेत मिळविले प्राविण्य

Advertisement

नीलेश परब / न्हावेली
अपंगत्व म्हणजे काही शिक्षा नव्हे तर ती व्यक्तीमधील अंगी असलेल्या विशेषत्वाची जाणीव करुन देण्यासाठी दिलेले एक लक्षण असते. म्हणूनच कुणी हात नसूनही आपल्या पायाने सुंदर चित्रे रेखाटतो तर कुणी आपल्या पायानेच शिल्पाकृती तयार करताना दिसतो अर्थात यातून त्यांनी आपल्या अपंगत्वावर मातच केलेली दिसून येते अशाच प्रकारे आपल्या आवडीला व महत्त्वाकांक्षेला जिद्द परिश्रम आणि चिकाटी यांची जोड दिली की अपंगत्वावर देखील मात करता येते हे आपल्या कर्तृत्वाने सिद्ध केले ते मातोंड पेंडूर घोडेमुख येथील हार्मोनियम वादक शैलेश लाडू सावंत यांनी.पहाडी आवाज लाभलेल्या वेंगुर्ला तालुक्यातील पेंडूर घोडेमुखचा सुपुत्र असलेल्या हार्मोनियम वादक व गायक शैलेश यांचा अपंगत्वावर मात करत भजन ते दशावतार प्रवास अगदी थक्कच करणारा आहे.गेली २५ वर्षे दशावतार क्षेत्रात वेगवेगळ्या मंडळात हार्मोनियम वादक म्हणून ते उत्तम प्रकारे भूमिका सांभाळत आहेत.दशावतार नाटक ही कोकणची परंपरा आहे कोकण आणि दशावतार हे वेगळेच समीकरण आहे.दशावतार हा कोकणातल्या लोकांच्या मनोरंजनाचा एक महत्त्वाचा स्रोत आहे.तसेच लोकांच्या श्रद्धेचाही भाग आहे.दशावतार क्षेत्रात जिल्ह्यातील अनेक दिग्गज कलाकारांनी आपल्या कर्तृत्वाची छाप सोडून नावलौकिक मिळवला आहे.त्यामुळेच अशा हौशी कलाकारांमुळेच शेकडो वर्षाची परंपरा असलेली ही लोककला कोकणात अजूनही जपली गेली असून आज सातासमुद्रापारदेखील पोहोचली आहे.वालावलकर दशावतार नाट्यमंडळात शैलेश सावंत यांनी सलग दहा वर्षे हार्मोनियम वादक म्हणून काम केले.तसेच ही कला सादर करताना दशावतारातील मोठमोठ्या कलाकारांचे त्यांना वेळोवेळी सहकार्य लाभले.जी जी चोडणकर व अष्टविनायक दशावतार कंपनीचे मालक बंड्या गोवेकर यांचेही त्यांना मोलाचे मार्गदर्शन लाभले या सर्वांचे त्यांनी आभार मानले.

Advertisement

वडिलांच्या पावलावर पाऊल …
याच दशावतार कलेच्या माध्यमातून नावलौकिक कमावलेले हार्मोनियम वादक म्हणजे पेंडूर घोडेमुख येथील शैलेश लाडू सावंत त्यांना अगदी लहानपणापासूनच संगीताची आवड होती.त्यांचे वडील लाडू श्रीधर सावंत हे सामाजिक नाटकात तबलावादन करत असत.त्यांनी वयाची २५ वर्षे सामाजिक नाटकात तबला साथ दिली होती.त्यामुळेच संगीताचा वारसा वडिलांपाठोपाठ आपणच शैलेश यांच्याकडे आला.त्यांना हार्मोनियम आणि गायन यांची आवड होती.उजव्या पायाने अपंग असतानाही ते पायपेटी वाजवत असत भजन क्षेत्रातून त्यांनी आपल्या हार्मोनियम वादन व गायनास सुरुवात केली.

भजन करता करता वळले दशावताराकडे !
घोडेमुख येथील सद्गगुरु प्रासादिक भजन मंडळामधून ते भजन करत असत.हरी गवंडे हे त्यांचे भजन क्षेत्रातील गुरु होते.भजन करता करता दशावतार क्षेत्राकडे हळूहळू त्यांची पावले वळली.रात्री दशावतार नाटकात हार्मोनियम साथ करत दिवसा ते शेती आणि आपला विटांचा व्यवसायही करत आहेत.थोर दशावतार कलाकार बाबी कलिंगण हे त्यांचे दशावतार क्षेत्रातील पहिले गुरु होते.दशावतारामध्ये पेटी कशी वाजवायची याचे धडे त्यांना बाबी कलिंगण यांच्याकडून मिळाले.बाबी कलिंगण हे दिवसा पेटी उघडून मार्गदर्शन करत व रिजाय करुन घेत असत.त्यामुळे ते आपल्यासाठी सर्वेसर्वा होते.असे सावंत यांनी सांगितले.

Advertisement
Tags :
# tarun bharat sindhudurg# news update # konkan update # marathi news #
Next Article