महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

ठकसेन दीपश्रीच्याही आवळल्या मुसक्या

12:51 PM Nov 05, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

पोलिसांना गुंगारा देत लपली होती बेळगावात : मोबाईलमुळे आली फोंडा पोलिसांच्या जाळ्यात

Advertisement

फोंडा : बेरोजगारांना सरकारी नोकरीचे आमिष दाखवून लाखो रूपयांना गंडा घालणाऱ्या टोळीतील मुख्य सूत्रधार संशयित दीप़श्री सावंत गावस हिला फोंडा पोलिसानी काल सोमवारी सायंकाळच्या सुमारास अटक केली. ‘जॉब स्कॅम’ प्रकरणात माशेल येथील एका शिक्षण संस्थेत नोकरी देण्याचे सांगून रू. 10 लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी गजाआड केलेल्या आयआरबी कॉन्स्टेबल सागर सुरेश नाईक व सुनिता पावस्कर यांना अटक केल्यानंतर दीपश्री सावंत हिला लूकआऊट नोटिस जारी करण्यात आली होती. अखेर काल तिच्या मुसक्य आवळण्यात फोंडा पोलिसांना यश आले. फोंडा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सागर नाईक व संशयित मुख्याध्यापिका सुनिता पावस्कर यांना अटक झाल्यानंतर दीपश्री सावंत ही गायब झाली होती. ती  बेळगांव येथे दडून बसली होती. मोबाईल फोनच्या लोकेशनद्वारे तिचा सुगावा लागल्यानंतर ती गोव्यात दाखल होताच तिला फोंडा पोलिसांनी अटक केली.

Advertisement

 दीपश्रीचे तीन नावांनी कारनामे

म्हार्दोळ येथील जॉब स्कॅम प्रकरणात अटक करण्यात आलेली आणि सध्या गजाआड असलेली मास्टरमाईंड श्रावणी सतरकर, उर्फ रूपा पालकर, उर्फ पूजा पुरूषोत्तम नाईक (39, हेल्थ वे इस्पितळाजवळ ओल्ड गोवा) ही जशी तीन नावाने परिचित होती, त्याचप्रमाणे दीपश्री ही कधी दीपश्री गावस, दीपश्री सावंत तर कधी दीपश्री माहतो अशा तीन नावांनी कारनामे करत होती. हे कारमाने तिने 2021 पासून सुरू केल्याची माहिती फोंडा पोलिसांनी दिली.

तक्रार करण्यास पुढे यावे

दीपश्रीने सत्तरी येथील एका उच्च शिक्षित युवकाला जलस्रोत खात्यात नोकरी देण्याचे आश्वासन दिल्यानंतर बनावट कागदपत्राद्वारे त्याच्या डोळ्यांना पाणी लावण्याचे काम करीत सुमारे 1 लाख रूपयांना गंडविलेले आहे. याबाबत वाळपई पोलिसस्थानकात तक्रारही नोंद आहे. दीपश्रीने ज्यांना गंडविले आहे, त्यांनी तक्रार दाखल करण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन निरीक्षक विजयनाथ कवळेकर यांनी केले आहे.

उसगांवातील तृप्ती प्रभूने केला पर्दाफाश 

माशेल येथील दीपक मेमोरियल एज्युकेशन सोसायटीच्या प्राथमिक शाळेत शिक्षकाचे पद देण्याच्या बहाण्याने पैसे उकळण्यामागे दीपश्री सावंत हीच मास्टमाईंड असल्याची कबूली यापूर्वी अटक करण्यात आलेल्या कॉन्स्टेबल सागर नाईक याने फोंडा पोलिसांना दिलेली आहे. दीपश्री त्या शाळेच्या पालक शिक्षक संघटनेची सदस्य होती. जॉब स्कॅमचा उलगडा गावकरवाडा उसगाव येथील पीडित तृप्ती प्रभू यांनी फोंडा पोलिसस्थानकात तक्रार नोंद केल्यानंतर झाला होता. प्रभू हिची 10 लाख ऊपयांची फसवणूक केली होती. संशयित सागरने ऑक्टोबर 2022 मध्ये पैसे घेतले आणि नोकरी देण्यात अपयशी ठरला आणि पैसेही परत केले नसल्यामुळे फोंडा पोलिसस्थानकात पोचल्यानंतर सर्व प्रकार उजेडात आला.

भाचा अन् मामीचे कारस्थान 

आयआरबी कॉन्स्टेबल सागर नाईक याला फोंडा पोलिसांनी 27 ऑक्टोबर 2024 रोजी अटक केली आहे. सखोल तपास केल्यानंतर याकामी सागरला याच शिक्षण संस्थेत मुख्याध्यापिका म्हणून कार्यरत असलेली त्याची नातेवाईक (मामी) संगीता पावस्कर (54) ही सामिल असल्याचा उलगडा झाला. त्यानंतर तपासकाम पुढे सरकल्यानंतर पैशाची देवाणघेवाणप्रकरणी दीपश्री सावंत हिचे नाव समोर आले. दरम्यान सुनीता पाऊसकर हिलाही अटक झाली होते. लागलीच फोंडा पोलिसांनी कठोर पावले उचलताना पडद्यामगे मास्टरमाईंड म्हणून वावरत असलेल्या दीपश्री सावंत गावस हिला फरार घोषित करीत तिच्याविरोधात लूक आऊट नोटिस जारी केली होती. काल तिला गजाआड करण्यात यश मिळाले.

फोंडा तालुक्यात जॉब स्कॅमची चार प्रकरणे

फोंडा तालुक्याच्या कार्यक्षेत्रात फोंडा व म्हार्दोळ पोलिसस्थानकाच्या हद्दीत जॉब स्कॅमची एकूण चार प्रकरणे उघडकीस आलेली आहेत. पहिल्या प्रकरणात म्हार्देळ पोलिसांनी पूजा नाईक व अजित सतरकर याला अटक केली. अन्य एक संशयित श्रीधर सतरकर याचा गळफासाने संशयास्पद मृत्यू झालेला आहे. दुसऱ्या प्रकरणात फोंडा पोलिसांनी सिंधुनगर कुर्टी येथील पशुवैद्यकीय डॉ. प्रकाश मुकुंद राणे (54) याच्याविरोधात 40 लाख रूपये घेतल्याची तक्रार दाखल केल्यानंतर त्याला अटक केली. तिसऱ्या प्रकरणात कॉन्स्टेबल सागर सुरेश नाईक याच्यासह सुनीता शशिकांत पावस्कर व दीपश्री सावंत गावस या तिघांचा समावेश असल्याचे प्रकरण उघडकीस आले होते. दीपाश्री हिला अटक झाल्याची प्रकार ताजी असतानाच आयआरबी कॉन्स्टेबल याच्याविरोधात सावर्डे येथील सदानंद विर्नोडकर याने तक्रार दाखल केलेली आहे. त्याला सार्वजनिक बांधकाम खात्यात कनिष्ठ अभियंता म्हणून नोकरी देण्याच्या बहाण्याने सागरने रू. 10 लाखांना गंडा घातल्याची तक्रार काल सोमवार 5 नोव्हे. रोजी दाखल करण्यात आली आहे.

श्रीधरच्या पत्नीची पूजाविरूद्ध तक्रार 

जॉब स्कॅम पूजा नाईक प्रकरणी संशयित असलेल्या श्रीधर सरतकर याचा मृतदेह सडलेल्या अवस्थेत कुकळये म्हार्दोळ येथे आढळल्यानंतर याप्रकरणी वेगळेच वळण घेतलेले आहे. मृत्यू नेमका कसा झाला याबाबत अहवाल राखून ठेवलेला आहे. सदरप्रकरणी श्रीधर सतरकर यांच्या पत्नीने म्हार्दोळ पोलिसस्थानकात मुख्य संशयित मास्टरमाईंड पूजा नाईक हिच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. आपल्या पतीचा मृत्यू हा पूजामुळेच झाल्याचा टपका ठेवण्यात आला आहे. यामागील खरे कारण पोलिसांनी शोधून काढावे असे म्हटले आहे. त्यानंतर म्हार्दोळ पोलिसांनी पूजा नाईक विरूद्ध भारतीय दंड संहितेच्या 108 कलमाखाली गुन्हा नेंदविण्याचे सोपस्करही पुर्ण केले आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article