स्पेनमध्ये भीषण वणवा, 12 जणांचा मृत्यू
वाढत्या उष्णतेच्या लाटेत मोठी दुर्घटना
वृत्तसंस्था/ माद्रिद
स्पेनमधील वणव्यात 12 जणांचा मृत्यू झाला असून सहा जण जखमी झाले आहेत. देशातील वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर लागलेल्या आगींपैकी ही आतापर्यंतची सर्वात प्राणघातक आग आहे. यातील अनेक बळी जळालेल्या क्षेत्रात सापडले. जंगलातील वणव्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी शुक्रवारी अग्निशमन दलाचे 150 जवान आणि स्पेनच्या लष्करी आपत्कालीन पथकाचे 220 सैनिक जोरदार प्रयत्न करत होते. आगीमुळे रस्ते बंद करावे लागले आणि 1,000 लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले.
सिएरा दे लॉस फिलाब्रास पर्वतरांगांजवळील एका लहान गावात ही आग लागली. आगीचे कारण अद्याप निश्चित झालेले नाही, परंतु अग्निशमन दलाच्या म्हणण्यानुसार, पडलेल्या वीज वाहिनीमुळे आग लागल्यानंतर ती वेगाने जवळच्या जंगलात पसरली. पंतप्रधान पेड्रो सांचेझ यांनी या घटनेवर शोक व्यक्त करत प्रशासनाला आग नियंत्रित करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचे निर्देश दिले आहेत.