Jotiba Temple Protest | जोतिबा पुजाऱ्यां विरोधात आज कोल्हापुरात विराट मोर्चा; प्रशासनाची विनंती ग्रामस्थांनी फेटाळली
पुजाऱ्यांविरोधात ३० मार्च रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार मोर्चा
भोगावती - पन्हाळा तालुक्यातील वाडीरत्नागिरी येथील जोतिबा मंदिरातील पुजाऱ्यांच्या मनमानी कारभाराविरोधात सोमवारी दि. ३० रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात येणारा मोर्चा हा निश्चित निघणार आहे. त्यामध्ये कोणत्याही परिस्थितीत बदल केला जाणार नाही. यामध्ये व्यापारी संघटना व पीडित भाविकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन परिते (ता. करवीर) गावचे सरपंच मनोज पाटील यांनी रविवारी केले आहे.
परिते ग्रामस्थांनी गावातून मूक मोर्चा काढून निषेध नोंदविला. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्याचा जाहीर केल्यानंतर या मोर्चा संदर्भात काल कोल्हापुरातील विश्रामगृहावर पन्हाळा आणि करवीर महसूल, पोलीस व देवस्थान प्रशासनाच्या वतीने चर्चेची बैठक झाली.
यामध्ये परिते ग्रामपंचायत शिष्टमंडळाला जोतिबा यात्रेच्या पार्श्वभूमीवर मोर्चा काढू नका, प्रशासनावर ताण येतो अशी विनंती केली होती. यावेळी शिष्टमंडळाने प्रशासनाचे ऐकून घेत आम्ही विनंतीला मान देतो. पण ग्रामस्थांची बैठक बोलावून त्या बैठकीत होणारा निर्णय कळवतो असे सांगितले होते. त्यानुसार शनिवारी झालेल्या ग्रामसभेत सोमवारी मोर्चा काढण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला आहे.
याबाबत शनिवारी परिते वे ग्रामस्थांची बैठक झाली. त्यामध्ये प्रशासनाची भूमिका सरपंच विजय पाटील यांनी ग्रामस्थांना सांगितली. यावर ग्रामस्थांनी तीव्र आक्षेप घेत कोणत्याही परिस्थितीत सोमवारी सर्व ग्रामस्थांच्यावतीने मोर्चा हा होणारच. र्व शिवाय जिल्हा आणि जिल्ह्याबाहेरील अनेक ग्रामपंचायतींनी पुजाऱ्यांच्या त्रासाला कंटाळून पाठिंबा व्यक्त T केला आहे. जर प्रशासनाला ने मध्यस्थी करायचीच होती, तर घटना घडल्यानंतर दोन दिवसात का केली नाही, आठ-दहा दिवसांत आमची दखल का घेतली नाही? असेअनेक प्रश्न ग्रामस्थांनी उपस्थित केले. त्यावेळी सरपंच निरूतर झाले. आम्हाला न्याय हवा आहे. जोपर्यंत पुजारी जोतिबा मंदिरातून हटविले जात नाहीत. तसेच शासकीय पुजारी नेमले जात नाहीत. तोपर्यंत आमचा लढा कायम राहणार असेही अनेक ग्रामस्थांनी मत व्यक्त केले.
याबाबत बोलताना सरपंच श्री. पाटील म्हणाले, संपूर्ण गावाचा निर्णय हा अंतिम निर्णय मान्य करून आम्ही मोर्चा सोमवारी काढणार आहोत. दरम्यान भोगावती व्यापारी संघटनेच्या वतीने सोमवारी कडकडीत बंद पाळून मोर्चात सहभागी होण्याचा निर्णय घेतल्याचे अध्यक्ष सर्जेराव पाटील यांनी जाहीर केले.
पुजारी हटाव, जोतिबा बचाव !
रविवारी २२ मार्च रोजी मारहाणीची घटना घडली होती. या मारहाणीचा व्हिडिओ संपूर्ण राज्यभर व्हायरल झाला होता. याबाबत अनेकांनी तीव्र प्रतिक्रिया देऊन परिते ग्रामस्थांना पाठिंबा दिला. त्यामुळे आता बाडी रत्नागिरी येथील डोंगरावरील पुजाऱ्यांच्या विरोधात 'पुजारी हटाव, जोतिबा बचाव" मोहीम अवलंबली जाणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.
भोगावती परिसरासह जिल्हा व जिल्ह्याबाहेरीलभोगावती परिसरातील ५२ गावांचा मोर्चाला पाठिंबा व सहभागी होणार
राधानगरी व करवीर तालुक्यातील भोगावती सहकारी साखर कारखाना कार्यक्षेत्रातील ५२ गाबांनी परिते ग्रामस्थांच्यावतीने सोमवारी होणाऱ्या जिल्हाधिकारी कार्यालयावरील विराट मोर्चाला पाठिंबा दिला आहे. तसेच त्यामध्ये सहभागी होणार असल्याचे सरपंच मनोज पाटील यांनी सांगितले. तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक भाविकांसह जिल्ह्याबाहेरील अनेक गावांतून पाठिंबा देणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
आज राशिवडे बाजारपेठ बंद
जोतिबा मंदिर येथे परिते ग्रामस्थांना केलेल्या मारहाणीच्या निषेधार्थ जिल्हाधिकारी कार्यालयावर निघणाऱ्या मोर्चासाठी पाठिंबा म्हणून सोमबार ३० मार्च रोजी राशिवडे बाजारपेठेत बंद पाळण्यात येणार असल्याची माहिती असोसिएशनचे अध्यक्ष व उपाध्यक्ष यांनी रविवारी दिली.