For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Sangli Fire Accident | पहाटेचा अग्नितांडव! १६ चाकी डिझेल टँकर जळून खाक; दोन तासांनी आग आटोक्यात

12:29 PM Jul 09, 2026 IST | NEETA POTDAR
sangli  fire accident   पहाटेचा अग्नितांडव  १६ चाकी डिझेल टँकर जळून खाक  दोन तासांनी आग आटोक्यात
Advertisement

सांगली -सांगलीतील माधवनगर-मिरज रोडवरील पालवी हॉटेल परिसरात पहाटे भीषण आग लागून १६ चाकी डिझेल टँकर पूर्णपणे जळून खाक झाला. अग्निशमन दलाच्या दोन तासांच्या शर्थीच्या प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले.

Advertisement

माधवनगर-मिरज रोडवरील होमगार्ड कार्यालयाजवळील मोठ्या शेडमध्ये उभ्या असलेल्या १६ चाकी डिझेल टँकरला गुरुवारी पहाटे अचानक आग लागली. काही क्षणांतच आगीने विक्राळ रूप धारण करत संपूर्ण टँकरला वेढले. उंच ज्वाळा आणि धुराचे लोट दूरवरून दिसत असल्याने परिसरात खळबळ उडाली. माहिती मिळताच मिरज येथून दोन आणि सांगली येथून एक अशा तीन अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या.

तब्बल दोन तासांच्या अथक प्रयत्नांनंतर जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवले. त्यामुळे आग शेजारील परिसरात पसरण्यापासून रोखण्यात यश आले. या आगीत टँकर पूर्णपणे जळून खाक झाला असून लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. विश्रामबाग पोलिसांनी घटनास्थळी पाहणी केली असून आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पुढील तपास सुरू आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.