पंढरपुरात भीषण आग! लक्ष्मी टाकळी येथील कारखान्यात शॉर्टसर्किटने लाखो रुपयांचे साहित्य खाक
पंढरपूरच्या कारखान्यातील मशिनरी आणि कच्चा माल आगीत खाक
पंढरपूर -लक्ष्मी टाकळी हद्दीत घरगुती वस्तू तयार करणाऱ्या कारखान्यात विजेच्या शॉर्टसर्किटने आग लागून मशिनरींसह लाखो रूपयांचे साहित्य जळून खाक झाले. ही दुर्घटना सोमवार, ९ मार्च रोजी सायंकाळी घडली.
गिरीजात्मकनगर भागात घरगुती वस्तू निर्मा मतीचा कारखाना सुरू करण्यात आला होता.
अनेक दिवसांपासून येथे घरगुती, संसारोपयोगी वस्तुंची निर्मिती केली जात होती. सोमवारी कामकाज सुरू असताना अचानक विजेचे शॉर्टसर्किट होऊन कच्चा माल असलेल्या ठिकाणी आग लागली. कापडी, प्लास्टीकचे साहित्य असल्याने कांही वेळातच आग मोठ्या प्रमाणावर पसरली. धुराचे लोट बाहेर येऊ लागले. त्यामुळे परिसरात भितीचे वातावरण पसरले.
माहिती मिळताच शिवसेनेचे संपर्क प्रमुख महेश साठे व सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. अग्निशामक दलाला पाचारण करून स्थानिकांच्या मदतीने युद्धपातळीवर आग विह्नाविण्याचे प्रयत्न सुरू केले. वेळीच कारखान्यातील सर्वांना बाहेर काढण्यातलक्ष्मी टाकळी : विजेच्या शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत मशिनरीसह साहित्याचे झालेले नुकसान.आले. अग्निशामक दलाचे वाहन दाखल होऊन पाण्याचा मारा सुरू केला. महेश साठे व सहकाऱ्यांनी शर्थीचे प्रयत्न करीत आग आटोक्यात आणली.