Kolhapur : वडकशिवाले–बाचणी मार्गालगत ऊस शेतीला भीषण आग; 20 एकर जळून खाक
इस्पूर्ली परिसरात ऊस शेती आगीत भस्मसात
इस्पूर्ली : वडकशिवाले (ता. करवीर) गावाच्या शेजारी व बाचणी (ता. कागल) गावाकडे जाणाऱ्या मार्गालगत रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी असलेल्या ऊस शेतीला भीषण आग लागली. या आगीत सुमारे २० एकरातील ऊस पीक जळून खाक झाले आहे.दुपारी सुमारे तीनच्या सुमारास ही आग लागली. आग आटोक्यात आणण्यासाठी परिसरातील शेतकरी व तरुणांनी प्रयत्न केले. या आगीत शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
शॉर्टसर्किटने मडीलगे बुद्रुक येथे दहा एकर ऊस जळाला.
या आगीत जवळजवळ दहा एकरातील ऊस जळून खाक झाला. त्यामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. बुधवारी दुपारच्या दरम्यान अचानक आग लागली. या आगीत बाळासो उगले, एकनाथ माने, सुभाष खाडे, मारुती येरुडकर, अमृत देसाई, सर्जेराव शिंदे आदी शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.