Phulewadi | पहाटेच्या सुमारास फुलेवाडी हादरली; रिंगरोडवरील सुपर बझारला आग, मोठे आर्थिक नुकसान
फुलेवाडीतील सुपर बाजारला भीषण आग
फुलेवाडी -चंद्राई कालनी-फुलेवाडी, रिंगरोड येथील मुख्य मार्गावरील सुपर बझार मार्केटला गुरुवारी पहाटे ५.३० च्या सुमारास आग लागली या आगीत सुमारे १५ ते २० लाख रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती अग्निशमन दत्ताने दिली आहे.
ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. आगीत मॉलचे सर्व लाईट वायरिंग जळून खाक झाले. यामध्ये सहा इलेक्ट्रिक बॅटऱ्या, संपूर्ण ऑफीस केबीन, छताचे पूर्ण सिलिंग, फैन्स, कागदपत्रे, सहा संगणक, दोन फ्रीज, कॅश काऊंटर, ३०० किलो तांदूळ व इतर साहित्य आगीत जळून खाक झाले. तत्पूर्वी अग्निशमन दलाने आगीवर तत्काळ नियंत्रण मिळविल्याने मॉलमधील उर्वरित साहित्य वाचवण्यास यश आले. सुमारे एक तासाने आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले.
फुलेवाडी सुपर बझारला लागलेली आग
आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी फुलेवाडी, टिंबर मार्केट, ताराराणी विभाग येवून एकूण तीन टैंकर मागवण्यात आले. आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी अग्निशमन दलाचे अधिकारी मनिष रणमिसे, जवानविजय सुतार, उमेश जगताप, सैफ म्हालदार, मोहसीन पठाण, संजय पाटील, प्रमोद मोरे, सुदेश पाटील, प्रभाकर खेबुडे, प्रवीण ब्रम्हवडे, किसन पवार, चेतन जानवेकर यांनी प्रयत्न केले.
मॉलबाहेर नागरिकांची गर्दी
ही आग पहाटेच्या सुमारास लागली, मार्निंग वाकला जाणाऱ्या-येणाऱ्या लोकांनी ही आग पाहिली व तत्काळ याची माहिती पोलीस व अग्निशमन दलाला देण्यात आली, आग लागल्याचे समजताच अनेकांनी घटनास्थळी धाव घेऊन आग आटोक्यात आणण्याबा प्रयत्न केला, मात्र आग जास्तच भडकून पसरल्याने लोकांना आगीवर नियंत्रण मिळवता आले नाही
सीसीटीव्ही जळून खाक
मॉलबाहेरील व आतील सीसीटीव्ही कैमेरे आगीत पूर्णतः जळाल्ल्त्याने आग नेमकी कशी लागली, याची माहिती जुना राजवाडा पोलीस घेत आहेत.